जपानची कॅप्स्यूल अवकाशातून पृथ्वीवर परतली

जपानची अवकाश संशोधन संस्था 'जाक्‍सा'च्या कॅप्स्यूलमधून अवकाशातील लघुग्रहाचे नमुने पृथ्वीवर पाठवले गेले. ही कॅप्स्यूल ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण भागातील निर्जन ठिकाणी सुखरूप पृथ्वीवर उतरली. त्यानंतर तिचा शोध घेऊन लघुग्रहाचे मौल्यवान नमुने शोधून काढण्यासाठी 'जॅक्‍सा'चे हेलिकॉप्टर आणि शोधपथक या भागामध्ये पोहोचले होते.

टोकियो(Tokyo).  जपानची अवकाश संशोधन संस्था ‘जाक्‍सा’च्या कॅप्स्यूलमधून अवकाशातील लघुग्रहाचे नमुने पृथ्वीवर पाठवले गेले. ही कॅप्स्यूल ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण भागातील निर्जन ठिकाणी सुखरूप पृथ्वीवर उतरली. त्यानंतर तिचा शोध घेऊन लघुग्रहाचे मौल्यवान नमुने शोधून काढण्यासाठी ‘जॅक्‍सा’चे हेलिकॉप्टर आणि शोधपथक या भागामध्ये पोहोचले होते.

ही कॅप्स्यूल शोधून काढून त्यातील नमुने ताब्यात घेण्यात आले आहेत. हे नमुने आता संशोधकांच्या स्वाधीन केले जाणार असून त्याच्या आधारे जीवसृष्टीच्या संदर्भातील मौल्यवान माहिती मिळण्याची शक्‍यता आहे, असे जपानच्या अंतराळ संशोधन संस्थेने म्हटले आहे.

‘हयाबुसा 2′ ने शनिवारी लहान कॅप्सूल यशस्वीरित्या सोडला लघुग्रहाचे नमुन्यांसह पृथ्वीकडे पाठविले, असे जपान एरोस्पेस एक्‍सप्लोरेशन एजन्सीने म्हटले होते. ही कॅप्स्यूल पृथ्वीपासून 120 किलोमीटर उंचीवर असताना पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच ही कॅप्स्यूल पेटली होती. मात्र तिच्या गुणधर्मानुसार ती नष्ट झाली नाही आणि नमुने सुरक्षित राहिले.

पेटलेली कॅप्स्यूल एखाद्या उल्केप्रमाणे अवकाशात स्पष्ट दिसू शकत होती. अवकाशातून 10 किलोमीटर अंतर शिल्लक राहिल्यावर कॅप्स्यूलचे पॅरेशूट उघडले गेले आणि ती अलगत पृथ्वीवर उतरली. त्यानंतर कॅप्स्यूलमधील सिग्नलही दिले जाऊ लागले होते. त्याच्या आधारे कॅप्स्यूलचा ठावठिकाणा शोधला जाऊ शकला.

कॅप्सूल परत आल्यानंतर सुमारे दोन तासांनंतर ‘जॅक्‍सा’च्या हेलिकॉप्टर शोध पथकाला नियोजित लॅंडिंग क्षेत्रात कॅप्सूल सापडला, असे ‘जॅक्‍सा’ने सांगितले. ही कॅप्स्यूल पृथ्वीवर पोहोचल्यानंतर चार तासांनी कॅप्स्यूल ताब्यात घेण्यात आली. त्यानंतर ‘जॅक्‍सा’ने एक ट्विट करून नमुने ताब्यात घेतले गेले असून कॅप्स्यूल पृथ्वीवर पोहोचवण्याचे मिशन पूर्ण झाले असल्याचे ट्विट केले आहे.

ही कॅप्सूल ‘हयाबुसा 2′ पासून वेगळी झाल्यानंतर पृथ्वीपासून तब्बल 220,000 किलोमीटर अंतरावरुन खाली आली. इतक्‍या उंचीवरून येणाऱ्या कॅप्स्यूलला नियंत्रित करणे ही खूप अवघड बाब होती. ऑस्ट्रेलियाच्या अंतराळ प्रयोगशाळेत प्राथमिक सुरक्षा तपासणी करून पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला कॅप्सूल जपानला परत आणण्याची आशा असल्याचे ‘जॅक्‍सा’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.