न्यूयॉर्क ते लंडनचा प्रवास अवघ्या साडेतीन तासांत ; सुपरसोनिक जेटसाठी प्रयत्न सुरु, ‘इतका’ येणार खर्च

सुपरसोनिक जेटची संकल्पना अस्तित्वात येणे शक्य आहे. यामुळे जलद हवाई प्रवास होईल. मात्र याचा खर्च प्रचंड असू शकतो बूमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक ब्लेक शोल यांनी याबाबत म्हटले आहे की, या विमानात प्रवास करणे बर्‍याच ग्राहकांच्या बजेट क्षमतेच्या बाहेर असू शकते. २०१८ मध्ये एका मुलाखतीत त्यांनी म्हटले होते की, सध्याच्या बिझिनेस क्लास तिकिटांच्या किंमती इतका किंवा त्यापेक्षा अधिक खर्च करून लोकांना अशा जेटमधून वेगाने प्रवास करणे शक्य होईल.

  न्यूयॉर्कः युनायटेड एअरलाइन्सने गुरुवारी जाहीर केले की, ते एअरलाइन्स स्टार्टअप बूम सुपरसोनिककडून १५ नवीन विमाने खरेदी करणार आहेत. एअरलाइनाच्या या हालचालीमुळे पुन्हा एकदा सुपरसोनिक जेट म्हणजेच वेगवान हवाई प्रवासाचा ट्रेंड सुरू होऊ शकतो. यासंदर्भात दोन्ही कंपन्यांनी संयुक्त प्रेसनोट जारी केली असून, त्यात युनायटेड एअरलाइन्स बुमचे ‘ओव्हरचर’ विमान खरेदी करणार असल्याचे सांगितले गेले आहे. या विमानांचा वापर साधारणपणे २०२९ पासून सुरू करण्याचे नियोजन आहे.

  या घोषणेमुळे सुपरसोनिक जेट प्रवास पुन्हा सुरू होण्याची शक्यता वाढली आहे, परंतु काही विश्लेषक याबद्दल विशेषत: प्रवासाची वेळ कमी केल्यामुळे घाबरले आहेत. या करारामध्ये१५ विमाने खरेदी करण्याबाबत बोलण्यात आले आहे आणि हा पर्यायही ठेवण्यात आला आहे की, विमान कंपनी आणखी ३५ विमान खरेदी करू शकते.

  कंपन्यांनी म्हटले आहे की बूम सुपरसोनिकच्या विमानात आजच्या विमानांपेक्षा दुप्पट वेगाने उड्डाण करण्याची क्षमता आहे. हे विमाने साडेतीन तासात न्यूयॉर्क ते लंडनमध्ये साडे तीन तासांत तर सहा तासांत सॅन फ्रान्सिस्को ते टोकीयो येथे जाण्यास सक्षम आहेत. यात इंधन म्हणून कार्बन वापरला जाणार नाही तर अक्षय इंधन वापरले जाईल.

  पूर्वी देखील सुपरसोनिक जेटचा वापर केला गेला

  सुपरसोनिक जेट ही कल्पना यापूर्वीही अस्तिस्त्वात होती. व्यावसायिक सुपरसोनिक जेट प्रवास प्रथम Concorde सह १९७० मध्ये करण्यात आला होता. परंतु पर्यावरणीय निर्बंधांमुळे त्याचा खर्च न परवडणारा होता, म्हणून २००३ मध्ये ते बंद झाले. तसेच २००० साली एअर फ्रान्समध्ये असलेल्या एका विमानास अपघात झाला होता, ज्यामध्ये ११३ लोक मरण पावले. यांनतर अशा जेट प्रवासावर निर्बंध घालण्यात आले. हे विमान ध्वनीपेक्षा दुप्पट वेगाने उड्डाण करू शकत होते . ध्वनीच्या अडथळ्याशी टक्कर घेत जो आवाज निघतो , तो ‘सोनिक बूम’ म्ह्णून आजही प्रसिद्ध आहे. या विमानात उड्डाण करण्याची क्षमता फक्त श्रीमंतामध्ये होती. कारण या जेटची तिकिटे खूप महाग होती. विमानात फक्त १००-१४० जागा होत्या. ज्या केवळ एअर फ्रान्स आणि एअर ब्रिटीश यांच्यासाठीच राखीव होत्या.

  अमाप खर्चाची शक्यता

  आता सुद्धा ही सुपरसोनिक जेटची संकल्पना अस्तित्वात येणे शक्य आहे. यामुळे जलद हवाई प्रवास होईल. मात्र याचा खर्च प्रचंड असू शकतो बूमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक ब्लेक शोल यांनी याबाबत म्हटले आहे की, या विमानात प्रवास करणे बर्‍याच ग्राहकांच्या बजेट क्षमतेच्या बाहेर असू शकते. २०१८ मध्ये एका मुलाखतीत त्यांनी म्हटले होते की, सध्याच्या बिझिनेस क्लास तिकिटांच्या किंमती इतका किंवा त्यापेक्षा अधिक खर्च करून लोकांना अशा जेटमधून वेगाने प्रवास करणे शक्य होईल.