ओसामाला शहीद म्हणणाऱ्या इम्रान खान यांची भाषा दुतोंडी

दिल्ली - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दहशतवादी ओसामा बीन लादेनच्या नावाचा शहिद म्हणून उल्लेख केला. ते संसदेत बोलत असताना अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बीन लादेन याचा उल्लेख शहीद असा

 दिल्ली – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दहशतवादी ओसामा बीन लादेनच्या नावाचा शहिद म्हणून उल्लेख केला. ते संसदेत बोलत असताना अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बीन लादेन याचा उल्लेख शहीद असा केला. यामुळे इम्रान खान यांच्यावर जगभरातून टीकेची झोड उठली आहे. ओसामा बीन लादेन हा अमेरिकेने केलेल्या कारवाईदरम्यान ठार मारला गेला होता. या परिस्थिती पाकिस्तानमधील पत्रकार आणि स्तंभलेखक मोहम्मद ताकी यांनी जारी केलेला व्हिडीओ आणि केलेले सुचक वक्तव्य खुपच बोलके आहे. 

यामुळे पाकिस्तान नेहमीच दहशतवाद्यांना आसरा देत असल्याचा संशय पुन्हा बळावला आहे. तसेच दहशतवाद्यांना मुक्त संचार करु देत असल्याचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. यामुळेच पाकिस्तानातील विचारवंतांना इम्रान खान यांचे वक्तव्य पटले नसल्याचे पाहायाला मिळत आहे. 

पाकिस्तानचे पत्रकार स्तंभलेखक यांनी ट्विटरद्वारे ह्विडिओ शेअर केला आहे. त्यात इम्रान खान म्हणाले होते की, जो निष्पापांचा बळी घेतो तो दहशतवादी आहे, असे सुचक वक्तव्य त्यांनी केले होते. यावर मोहम्मद ताकी यांनी इम्रान खान यांना दुट्प्पीपणा असल्याचे संबोधले आहे.