मोदी सरकार अमेरिकेच्या निर्बंधांच्या इशाऱ्यांना झुगारणार, खरेदी करणार एस-400 क्षेपणास्त्र

एस-400 हे शक्तिशाली क्षेपणास्त्र सुमारे 380 किमी. अंतरामध्ये ड्रोन, लढाऊ विमान, गुप्तचर विमाने, क्षेपणास्त्रे आणि बॉम्बर शोधून काढण्यास व त्यांची हत्या करण्यास सक्षम आहे. संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीन आणि पाकिस्तानकडून होणारा धोका लक्षात घेता हे पश्चिम, उत्तर आणि पूर्वेकडील भागात तैनात केले जाईल.

नवराष्ट्र न्यूज नेटवर्क

दिल्ली. अमेरिकेच्या संसदेकडून टाकण्यात आलेल्या निर्बंधांना डालून भारत रशियाकडून शक्तिशाली एस-400 ट्रायन्फ मिसाईल सिस्टिम खरेदी करण्याची तयारी करीत आहे. . एस-400 हे रशियाच्या सर्वांत प्रगत पृष्ठभागावरून पृष्ठभागावर हल्ला करणारे क्षेपणास्त्र म्हणून ओळखले जाते. गेल्या महिन्यात रशियाने सांगितले की अमेरिकेच्या निर्बंधांनंतरही एस-400 क्षेपणास्त्र यंत्रणेच्या पहिल्या तुकडीच्या पुरवठ्यासह सध्याचे संरक्षण सौदे पूर्ण करण्यात येत आहेत. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये डिलिव्हरी होण्यापूर्वी भारतीय हवाई दलाचा एक मोठा संघ या महिन्याच्या अखेरीस रशियाला भेट देईल.

2023 पर्यंत येणार भारतात

ऑक्टोबर 2018 मध्ये, रशियाकडून पाच एस-400 मोबाईल स्क्वाड्रन खरेदी करण्यासाठी भारताने 5.43 अब्ज डॉलर्सचा करार केला. या क्षेपणास्त्र यंत्रणेसाठी भारताने रशियाला 201त9 मध्ये 80 दशलक्ष डॉलर्सचा पहिला हप्ता दिला. त्याचबरोबर ही क्षेपणास्त्र यंत्रणा एप्रिल 2023 पर्यंत भारतात येण्याची शक्यता आहे.

शक्तिशाली क्षेपणास्त्र

एस-400 हे शक्तिशाली क्षेपणास्त्र सुमारे 380 किमी. अंतरामध्ये ड्रोन, लढाऊ विमान, गुप्तचर विमाने, क्षेपणास्त्रे आणि बॉम्बर शोधून काढण्यास व त्यांची हत्या करण्यास सक्षम आहे. संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीन आणि पाकिस्तानकडून होणारा धोका लक्षात घेता हे पश्चिम, उत्तर आणि पूर्वेकडील भागात तैनात केले जाईल.

अधिकाऱ्यांची टीम जाणार रशियाला

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुमारे 100 अधिकाऱ्यांची मोठी टीम रशियाला जाईल. हे अधिकारी तेथील एस-400 चालविण्यासाठी आणि देखरेखीसाठी संपूर्ण प्रशिक्षण घेतील. संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये त्याची डिलिव्हरी सुरू होईल अशी माहिती दिली आहे. एस-400 चे पहिले पथक 2021 च्या उत्तरार्धात किंवा 2022 च्या सुरुवातीस भारतात कार्यरत होईल.

भारताकडे स्वतंत्र परराष्ट्र धोरण

अमेरिकन कॉंग्रेसच्या अहवालात असा इशारा देण्यात आला आहे की रशियन बनावटीची एस -400 हवाई संरक्षण यंत्रणा खरेदी करण्यासाठी कोट्यवधी डॉलर्सच्या भारताच्या करारासाठी अमेरिका त्यावर बंदी घालू शकते. त्याचबरोबर, परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारताकडे नेहमीच स्वतंत्र परराष्ट्र धोरण होते जे संरक्षण संरक्षण आणि पुरवठ्यासही लागू होते.

…………..