इस्त्रायली गुप्तचर यंत्रणेचे ऑपरेशन; ३ पॅलेस्टिनीचा खात्मा

इस्त्रायली सैन्य आणि गुप्तचर यंत्रणेने एक गुपीत कारवाई केली आहे. यामध्ये 3 पॅलेस्टाईनियन मारले गेले आहेत. यातील दोन गुप्तचर अधिकारी होते. बुधवारी आणि गुरुवारी मध्यरात्रीच्या वेळी इस्त्रायली-व्याप्त वेस्ट बँक शहर जेनिन येथे ही कारवाई करण्यात आली. अद्याप हमासने या घटनेवर भाष्य केले नाही.

    इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन दरम्यान तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, इस्त्रायली सैन्य आणि गुप्तचर यंत्रणेने एक गुपीत कारवाई केली आहे. यामध्ये 3 पॅलेस्टाईनियन मारले गेले आहेत. यातील दोन गुप्तचर अधिकारी होते. बुधवारी आणि गुरुवारी मध्यरात्रीच्या वेळी इस्त्रायली-व्याप्त वेस्ट बँक शहर जेनिन येथे ही कारवाई करण्यात आली. अद्याप हमासने या घटनेवर भाष्य केले नाही.

    ठार केलेले कोण आहेत ?

    ‘अल जझीरा’ टीव्ही चॅनलनुसार मृतांची संख्या तीनपेक्षा जास्त असू शकते. आतापर्यंत मेलेल्या तीन लोकांची नावे समोर आली आहेत. त्यातील दोन पॅलेस्टाईन प्राधिकरणाचे सैन्य गुप्तचर अधिकारी होते. यासिल अलवी आणि तासीर ईसा अशी त्यांची नावे आहेत. तिसर्‍याचे नाव जमील. याशिवाय एक अधिकारी गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्याचा दावाही केला जात आहे. दरम्यान इस्रायली एजन्सींनी या कारवाईसाठी सैन्य वाहनाऐवजी नागरी वाहने वापरली. पॅलेस्टाईन हेर आणि काही सैनिक वाहनात मिशनसाठी जात असताना हा हल्ला करण्यात आला.

    दरम्यान गुरुवारी ठार झालेल्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. हजारो लोकांनी यात हजेरी लावली. पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांच्या प्रवक्त्याने सांगितले- इस्त्राईलची चाल या क्षेत्रासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते. इस्राईलच्या गुप्तहेर संस्था सातत्याने कारवाई करीत आहेत.