अंटार्क्टिका खंडातही कोरोनाचा उगम, जगभरातील संशोधकांमध्ये उडाली खळबळ

जगाचे दक्षिण टोक असलेला अंटार्क्टिका (Antarctica) खंड या विषाणूपासून दूर होता. परंतु या भागातही कोरोनाचा (COVID-19) उगम झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या भागात चिलीच्या रिसर्च सेंटरमधील ३६ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे

अंटार्क्टिका : संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूचा (Corona virus) प्रादुर्भाव मोठ्या संख्येने पसरत आहे. अमेरिका, ब्रिटन आणि युरोपीय देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. जगाचे दक्षिण टोक असलेला अंटार्क्टिका (Antarctica) खंड या विषाणूपासून दूर होता. परंतु या भागातही कोरोनाचा (COVID-19) उगम झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या भागात चिलीच्या रिसर्च सेंटरमधील ३६ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच ३६ पैकी २६ जण हे लष्कराचे जवान असून १० जण मॅनेजमेंट टीमचे सदस्य आहेत.

अंटार्क्टिकामध्ये अनेक देशांची रिसर्च सेंटर आहेत. जगभरात कोरोना विषाणूचं प्रमाण वाढल्यानंतर त्या ठिकाणी देखील अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे शास्त्रज्ञांना काम करताना अनेक अडचणी सहन कराव्या लागत आहेत. चिलीच्या टीमसाठी साहित्य घेऊन एक जहाज २७ नोव्हेंबर रोजी अंटार्क्टिकामध्ये आले होते. याच जहाजातून कोरोना विषाणू (Coronavirus) दाखल झाला अशी शक्यता वर्तवली जात आहे.

चिलीच्या लष्करानं फेटाळला दावा

चिलीच्या लष्कारानं हा दावा फेटाळून लावला आहे. हे जहाज पाठवण्यापूर्वी यामधील सर्व साहित्याची तपासणी करण्यात आली होती. तसेच जहाजातील सर्व कर्मचारी निगेटिव्ह होते. असा दावा चिलीच्या लष्करानं केला आहे.

नव्या कोरोना विषाणूचा कहर

ब्रिटनमध्ये नवीन कोरोना विषाणू सापडला असल्याच्या बातमीनंतर जगभर खळबळ उडाली आहे. भारतासह जगातील अनेक देशांनी आता ब्रिटनमधून येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूकीवर निर्बंध आणले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यात २३ डिसेंबर ते ५ जानेवारी पर्यंत रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत कर्फ्यू लावण्यात आला आहे.