समलैंगिक संबंधांबाबत ‘या’ देशाच्या संसदेने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

थिम्पू : भूतानच्या (Bhutan) संसदेने समलैंगिक संबंधाबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला असून घेतलेला निर्णयाबाबत तेथील राजाची मान्यता मिळणे बाकी आह. भूतानमध्ये समलैंगिक संबंधाना मान्यता देण्यात आली असून यापुढे ते अपराध ठरणार नाही. सरकारच्या या निर्णयामुळे एलजीबीटी समुदायाचे नागरिक आनंदीत झाले आहेत. संसदेच्या दोन्ही सदनांच्या संयुक्त बैठकीत (Parliament joint Committee) यासंबंधी निर्णय घेण्यात आला असून या संबंधांना गुन्ह्याच्या श्रेणीतून बाहेर काढण्यात आले आहे. यापूर्वी भूतानमध्ये समलैंगिक संबंध हे अपराध ठरत होते. भूतानच्या दंड विधानानुसार कलम २१३ आणि २१४ नुसार हे अपराध ठरत होते. परंतु काल झालेल्या संसदेच्या संयुक्त बैठकीत हे कलम रद्द करण्यात आल्यामुळे या संबंधांना कायदेशीर मान्यता मिळाली आहे.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेला भूतानमधील खासदार आणि संयुक्त संसदीय समितीचे उपाध्यक्ष उज्ञेन वांगडी यांनी दिलेल्या माहितीनुसार या बिलाला १०० टक्के मान्यता देण्यात आली आहे. दोन्ही सदनांतील 69 पैकी 63 सदस्य मतदानावेळी उपस्थित होते. तर सहा सदस्य अनुपस्थित होते. यापूर्वी भूतानमध्ये या संबंधांना अनैसर्गिक संबंध म्हटलं जात असे. परंतु यापुढे ते सामान्य संबंधांमध्ये गृहित धरले जाणार आहेत.

-राजाची परवानगी बाकी

या निर्णयाला भूतानच्या राजाची मंजुरी मिळणे बाकी आहे. राजाने याला मंजुरी दिल्यानंतर याचे कायद्यात रूपांतर होणार असून समलैंगिक संबंध अधिकृत होणार आहेत. याविषयी मानवाधिकार कार्यकर्ते ताशी शेटेन यांनी प्रतिक्रिया देताना आपण खूप आनंदित असल्याचे आणि एलजीबीटी कम्युनिटीचा हा विजय असल्याचे म्हटले आहे.