प्रवासी बोट नदीत उलटली; ५१ जणांना जलसमाधी

    किनहासा (Kinhasa) . डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये बोट उलटल्याने 100 हून अधिक लोक बेपत्ता झाले आहे. प्रांतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना कांगो नदीत घडली. अपघातावेळी बोटीवर 100 हून अधिक प्रवासी होते.

    उत्तर-पश्चिम प्रांताच्या मोंगालाचे प्रवक्ते नेस्टर मॅगबाडो यांच्या मते, सध्या नदीपात्रातून 51 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. बोटीवरील अन्य 69 जण अद्याप बेपत्ता आहेत. या अपघातात 39 प्रवासी बचावले आहेत.

    यापूर्वी कांगोमध्ये 15 फेब्रुवारी रोजी एक बोट पलटी झाल्याने 60 जणांचा मृत्यू झाला होता. हा अपघातही कांगो नदीतच घडला होता. बोटीवर क्षमतेपेक्षा जास्त लोक होते, यामुळे बोट बुडाली.