क्रूरतेचा कळस! तालिबान्यांनी गर्भवती महिलेची कुटुंबीयांसमोरच केली हत्या

अमेरिकेच्या २० वर्षाच्या काळात ज्यांनी अफगाणिस्तानच्या पोलीस दलात काम केले आहे त्यांना लक्ष्य करण्याचा सध्या तालिबानचा प्रयत्न आहे.नुकतीच काबूलमध्ये काही महिलांनी तालिबानी नेत्यांच्या विरोधात निदर्शने करून महिलांना न्याय मिळावा, ही मागणी केली होती. मात्र याचा काही एक परिणाम तालिबान्यांवर झाला नाही.

    काबूल : तालिबानच्या क्रूरतेच्या कहाण्या यापूर्वीही अनेकांनी ऐकल्या आहेत. मात्र यावेळेस तालिबानने क्रूरतेचा कळस गाठला आहे. तालिबान्यांनी घोर प्रांतातीाल एका गर्भवती महिला पोलीस कर्मचाऱ्याची तिच्या कुटुंबीयांसमोरच गोळ्या घालून हत्या केली. ही महिला सहा महिन्यांची गर्भवती होती. तिने जेव्हा तालीबान्यांना याबाबत दिली तरी क्रूर तालिबान्यांनी तिला काही दया दाखवली नाही. एका पत्रकाराने याबाबत माहिती दिली आहे.

    अमेरिकेच्या २० वर्षाच्या काळात ज्यांनी अफगाणिस्तानच्या पोलीस दलात काम केले आहे त्यांना लक्ष्य करण्याचा सध्या तालिबानचा प्रयत्न आहे.नुकतीच काबूलमध्ये काही महिलांनी तालिबानी नेत्यांच्या विरोधात निदर्शने करून महिलांना न्याय मिळावा, ही मागणी केली होती. मात्र याचा काही एक परिणाम तालिबान्यांवर झाला नाही. त्यातून आता महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांचीही काही गय होणार नाही असे चित्र तालिबान्यांनी चित्र निर्माण केले आहे.