ब्रिटनमध्ये ‘एलियन्स’च्या दहशतीमुळे विमाने वळविली

कोवेंट्री/लंडन : ब्रिटेनच्या कोवेंट्री शहरात एलियन्सने हल्ला केल्याच्या वृत्तामुळे दहशत पसरली आहे. एवढेच नाही, तर या शहरावरून जाणाऱ्या विमानांना इतर ठिकाणावरून वळविण्यात आले आहे. सोशल मीडियावर कोवेंट्री शहरावर आसमंतात दिसत असलेल्या कथित यूएफओबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कोवेंट्री शहरात जलदगतीने अवकाशाकडे झेपावणारा हिरवा-निळा प्रकाश दिसून आल्याने आणि तो पृथ्वीशी संबंधित असल्यामुळे लोकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

सोशल मीडियावर हल्ल्याची अफवा

अशातच, या प्रकाशाची सत्य माहिती समोर आली आहे. हा शक्तिशाली लेजर लाईटच्या चाचणीचा भाग होता. क्वांट लेजर्स कंपनी ही चाचणी करीत होती आणि यासाठी प्रशासनालाही सतर्क करण्यात आले होते. मात्र, सर्वसामान्य नागरिकांमध्ये यूएफओची दहशत पसरली आणि इंटरनेटवरून एलियन्सने हल्ला केल्याची अफवा पसरविली गेली. क्वाटं लेजर्स कंपनीच्या या चाचणीत हिरव्या आणि निळ्या रंगाचे लेजर लाईट अवकाशाकडे जलदगतीने झेपावताना दिसत आहे. हा नजारा वीस मैल अंतरावरूनही पाहता येत होता. यानंतर एका व्यक्तीने सोशल मीडियावर एलियन्सने हल्ला केल्याची शक्यता व्यक्त केली. मदरशिपवरून पृथ्वीशी संपर्क साधण्यासाठी याप्रकारच्या लाईटचा वापर केला जात आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आणि हळूहळू ही अफवा संपूर्ण शहरात पसरली.
बॉक्स

प्रशासनाला देण्यात आली होती सूचना

क्वाटं लेजर्स कंपनीच्या मॅट लॉरेंस यांनी सांगितले की, ही चाचणी आम्ही इतर शहरातही केली आहे. आम्ही यासाठी प्रसासनाची परवानगी घेतलीहोती आणि विमानतळ प्राधिकरणालाही सूचना केली होती. यामुळे सर्व विमाने लेजरबीमपासून दूर अंतरावरून वळविली गेली. याबाबत पसरणाऱ्या अफवांबाबत आम्हाला अंदाज होताच. ही चाचणी 17 ऑक्टोबरला करण्यात आली मात्र, अजूनही या चर्चा सुरूच आहे, असेही त्यांनी सांगितले.