या देशात आणि या प्राण्यातून नवा भयंकर रोग पसरण्याची शक्यता; शास्त्रज्ञांनी शोधली पुढची महामारी

    कोरोनाने जगभरात थैमान घातलं आहे. दरम्यान असं असताना आता शास्त्रज्ञांनी  भविष्यात येऊ शकणाऱ्या महामारीचा कुठून आणि कुठल्या प्राण्यातून हा धोका आहे याचा शोध लावला आहे. तसेच हे संकट टाळण्याचा मार्गही सांगितला आहे. यंदा हे संकट ब्राझिलच्या अॅमेझॉनच्या जंगलातून तिथल्या वटवाघळांच्या माकडांच्या आणि उंदराच्या) प्रजातींमध्ये आढळणाऱ्या जिवाण आणि विषाणूंपासू पसरण्याची शक्यता आहे.

    विद्यापीठाच्या संशोधनातून समोर आला धोका

    ब्राझीलच्या मानौस इथल्या फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ अॅमेझोनासचे जीवशास्त्रज्ञ मार्सेलो गोर्डो आणि त्यांच्या सहकाऱ्यांना नुकतेच एका कूलरमध्ये तीन पाईड टॅमरिन माकडांचे शव मिळाले. कुणीतरी कूलरचा वीजपुरवठा बंद केला होता ज्यामुळे ही शवे आतच सडून गेली होती. मार्सेलो यांनी या माकडांचे नमुने घेतले आणि फियोक्रूज अॅमेझोनिया बायोबँकला नेले आणि तिथे त्या नमुन्यांमधील परजीवी, विषाणू आणि संक्रामक एजंट्सचा शोध घेतला गेला. तिथल्या तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मानव हा या जीवांच्या नैसर्गिक अधिवासात ज्या पद्धतीने आक्रमण करत आहे ते लक्षात घेता वन्यजीवांच्या शरीरातील परजीवी, विषाणू आणि संक्रामक एजंट्स मानवांवर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. हेच चीनमध्येही झाले होते.

    भविष्यातील महामारीवरची संभाव्य कारणे

    ब्राझीलच्या मानौसच्या चारी बाजूंना अॅमेझॉनचे जंगल आहे. इथे 22 लाख लोक राहतात. जगभरातील 1400 वटवाघळांच्या प्रजातींपैकी 12 टक्के प्रजाती या फक्त अॅमेझॉनच्या जंगलात आढळतात. याशिवाय माकडे आणि उंदरांच्या इथे राहणाऱ्या अशा अनेक प्रजातींमध्ये परजीवी, विषाणू आणि संक्रामक एजंट्स आढळून येतात. यांचे रुपांतर कधीही मानवावर आक्रमण करून भविष्यातील महामारीत होऊ शकते. यामागे शहरीकरण, रस्तेबांधणी, धरणे बांधणी, खाणकाम आणि जंगलांचा नाश ही प्रमुख कारणे आहेत. आणि या गोष्टी नियंत्रणात आणणे हाच हे संकट टाळण्याचा उपाय आहे.