China loses power, fears of losing working hands: China's population growth slows over last 10 years

चीनमध्ये गेल्या वर्षी लोकसंख्या वाढीचा दर 1960 च्या दशकापासून सर्वात कमी आहे. हे लक्षात घेता चीनने येथे आपले कुटुंब नियोजन शिथिल केले आहे. देशातील अर्ध्याहून अधिक नागरिक वयोवृद्ध होत असल्याने चीनची चिंता वाढली आहे. त्यामुळे हा नियम शिथील करण्याचा निर्णय चीन सरकारने घेतला आहे. चीनमध्ये आता दाम्पत्य तीन मुलांना जन्म देऊ शकतात.

  बीजिंग : चीनमध्ये गेल्या वर्षी लोकसंख्या वाढीचा दर 1960 च्या दशकापासून सर्वात कमी आहे. हे लक्षात घेता चीनने येथे आपले कुटुंब नियोजन शिथिल केले आहे. देशातील अर्ध्याहून अधिक नागरिक वयोवृद्ध होत असल्याने चीनची चिंता वाढली आहे. त्यामुळे हा नियम शिथील करण्याचा निर्णय चीन सरकारने घेतला आहे. चीनमध्ये आता दाम्पत्य तीन मुलांना जन्म देऊ शकतात.

  यापूर्वी चीनमध्ये केवळ दोन मुलांना जन्म घेण्याची परवानगी होती. चीनला मुले होऊ देण्याच्या निर्णयाची घोषणा करण्यापूर्वी अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक झाली. यानंतर निवेदन प्रसिद्ध करुन अधिकृत घोषणा करण्यात आली. चीनची लोकसंख्या 2019 च्या तुलनेत 0.53 टक्के वाढून 1.41178 अब्ज झाली. 2019 मध्ये लोकसंख्या 1.4 अब्ज होती. ही लोकसंख्या पुढील वर्षीपासून घटण्याची शक्यता आहे. चीन सरकारकडून जारी करण्यात आलेल्या सातव्या राष्ट्रीय जनसंख्या जनगणनेनुसार, चीनचे सर्व 31 प्रांत, स्वायत्त क्षेत्र आणि नगरपालिकाची लोकसंख्या 1.41178 अब्ज होती.

  काम करणाऱ्या लोकांची संख्या कमी

  राष्ट्रीय सांख्यिकी ब्यूरोनुसार, नवीन जनगणनेच्या आकड्यांद्वारे माहिती पडते की, चीन ज्या संकटाचा सामना करीत होता. ते संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. कारण देशात 60 वर्षापेक्षा अधिक लोकांची लोकसंख्या वाढून 26.4 कोटी झाली आहे. याचा विकासावर परिणाम पडेल. देशात 89.4 कोटी लोकांचे वय 15 ते 59 वर्षादरम्यान आहे, जे की 2010 च्या तुलनेत 6.79 टक्के कमी आहे. चीनच्या नेत्यांनी लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी 1980 पासून जन्मासंबंधी मर्यादा लागू केल्या होत्या. परंतु, आता त्यांना या गोष्टीची चिंता आहे की, देशात काम करणाऱ्या लोकांची संख्या तेजीने कमी होत आहे आणि यामुळे समृद्ध अर्थव्यवस्था प्रभावित होत आहे.

  मुलांचा सरासरी जन्म दर सर्वात कमी

  चीनमध्ये जन्मासंबंधी मर्यादांमध्ये सूट दिली जात आहे. परंतु, दाम्पत्य महागाई, छोटे निवास आणि महिलांसोबत नोकरीत होणाऱ्या भेदभावांमुळे मुलांना जन्म देण्याचे टाळत आहेत. अलीकडेच चीनने आपल्या लोकसंख्येचे आकडेवारी जाहीर केली, त्यानुसार गेल्या दशकात चीनमधील मुलांचे सरासरी जन्म दर सर्वात कमी होते. याचे मुख्य कारण चीनच्या दोन मुलांच्या धोरणाला देण्यात आले. या आकडेवारीनुसार, सन 2020 मध्ये चीनमध्ये केवळ 12 दशलक्ष मुले जन्माला आली. म्हणजेच 1960 नंतर चीनमध्ये जन्मलेल्या मुलांची संख्याही सर्वात कमी गाठली.