The salt of the Indian peasant movement spread to Nepal as well

काठमांडू : भारतातील शेतकरी आंदोलनाचे लोण आता शेजारील नेपाळमध्येही पसरले आहे. भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाप्रमाणेच नेपाळमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीही राजथानी काठमांडू येथे ठाण मांडले.

ऊस उत्पादनाला हमीभाव देण्याची मागणी करीत गेल्या रविवारपासून शेतकऱ्यांनी राजधानीत ठाण मांडले आहे. सरकारने चर्चा करण्यास नकार दिल्याचा आरोपही येथील शेतकऱ्यांनी केला.

गृहमंत्री रामबहादुर थापा यांनी अन्य मंत्री व अधिकाऱ्यांसोबत या आंदोलनाच्या मुद्यावर चर्चा केली होती. दरम्यान शेतकऱ्यांनी त्यांचे आंदोलन शांततेत सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार केला आहे.