काय सांगताय..,कोरोना चाचणी करण्यासाठी आता स्मार्टफोनचा वापर होणार, ३० मिनिटांत रिपोर्ट हातात

स्मार्टफोनमधील (Smart Phone) कॅमेऱ्याचा (Camera) वापर आपण सामान्यपणे फोटो किंवा सेल्फी काढण्यासाठी करतो. पण त्याचा वापर करून कोरोना (Corona) चाचणी करणं आता शक्य होणार आहे. विशेष म्हणजे या चाचणीचा रिपोर्ट ३० मिनिटांत मिळणार आहे. हे अनोखं तंत्रज्ञान ग्लॅडस्टोन इन्स्टिट्युटस ( Gladstone Institutes), युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया (University of California), बर्केली (UC Berkeley), सॅन फ्रॅन्सिस्कोतल्या (UCSF) शास्त्रज्ञांनी तयार केलं आहे.

वॉशिंग्टन : सध्या केल्या जात असलेल्या मॉलिक्युलर (RT-PCR) आणि प्रतिजैवके (Serology) या चाचण्या नागरिकांसाठी वेळखाऊ ठरत आहेत. प्रयोगशाळांवरील ताण तसंच अन्य कारणांमुळे या चाचण्यांचा अहवाल येण्यास काही दिवस जात आहेत. मात्र आता संशोधकांनी सीआरआयएसपीआर (CRISPR) वर आधारित एक टेक्नोलॉजी विकसित केली आहे. यानुसार स्मार्टफोनचा वापर करून कोरोना चाचणी करणं शक्य होणार आहे.

स्मार्टफोनमधील (Smart Phone) कॅमेऱ्याचा (Camera) वापर आपण सामान्यपणे फोटो किंवा सेल्फी काढण्यासाठी करतो. पण त्याचा वापर करून कोरोना (Corona) चाचणी करणं आता शक्य होणार आहे. विशेष म्हणजे या चाचणीचा रिपोर्ट ३० मिनिटांत मिळणार आहे. हे अनोखं तंत्रज्ञान ग्लॅडस्टोन इन्स्टिट्युटस ( Gladstone Institutes), युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया (University of California), बर्केली (UC Berkeley), सॅन फ्रॅन्सिस्कोतल्या (UCSF) शास्त्रज्ञांनी तयार केलं आहे. याबाबत जर्नल सेल (Journal cell) मध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

सायटेक डेलीच्या मते (Scitech Daily) ग्लॅडस्टोन इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीच्या अध्यक्षा आणि अभ्यास पथकाच्या प्रमुख मेलानी ओट म्हणाल्या, कोरोनाच्या अनुषंगाने केवळ चाचण्यांची संख्या वाढवणं हे महत्त्वाचं नसून वेगवान चाचणीचा पर्याय देणं आवश्यक आहे. आम्ही आखणी केलेले तंत्रज्ञान कमी किमतीत चाचणीचा पर्याय आणि कोरोनाच्या वेगात होत असलेल्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.