पंजशीर खोऱ्यातील युद्धाच्या आव्हानाला तालिबान घाबरला, यामागील नेमकं काय आहे कारण?

काबूलच्या उत्तरेस स्थित पंजशीर घाटी ही तालिबानविरोधी शक्तींचा प्रमुख गड आहे. संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तालिबानने तेथे आक्रमण केले आणि जबरदस्तीने ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याला तिथले जमलेले सशस्त्र गट योग्य पद्धतीने उत्तर देऊ शकतात. हिंदुकुश पर्वतरांगांनी वेढलेले पंजशीर खोरे फार पूर्वीपासून तालिबानविरोधी शक्तींचे केंद्र आहे. 

    अफगाणिस्तानमध्ये पंजशीर खोरे हा एकमेव देशाचा भाग आहे. परंतु हा भाग तालिबानच्या नियंत्रणाबाहेर आहे. युद्धग्रस्त अफगाणिस्तान वेगाने तालिबानच्या नियंत्रणाखाली आला, पण तालिबानी दहशतवाद्यांनाना पंजशीर खोऱ्यावर ताबा मिळवता आलेला नाही. तसेच पंजशीर खोऱ्यातून तालिबानला आव्हान दिले जात आहे.

    काबूलच्या उत्तरेस स्थित पंजशीर घाटी ही तालिबानविरोधी शक्तींचा प्रमुख गड आहे. संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तालिबानने तेथे आक्रमण केले आणि जबरदस्तीने ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याला तिथले जमलेले सशस्त्र गट योग्य पद्धतीने उत्तर देऊ शकतात. हिंदुकुश पर्वतरांगांनी वेढलेले पंजशीर खोरे फार पूर्वीपासून तालिबानविरोधी शक्तींचे केंद्र आहे.

    अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी तालिबानविरुद्ध युद्धाची घोषणा केलीय. देशाच्या घटनेनुसार राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत देशाचे कार्यवाहक राष्ट्रपती बनतात. त्याचप्रमाणे त्यांनी स्वतःला अफगाणिस्तानचे राष्ट्रपती घोषित केले आहे.