अल्लाह हू अकबर असा जयघोष करत तालिबानींनी 22 निशस्त्र लोकांना गोळ्या झाडल्या

    काबूल : अफगाणिस्तानात सध्या सुरू असलेल्या हिंसाचारादरम्यान तालिबानच्या क्रौर्याचा एक अत्यंत भयावह व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत असे दिसून आले आहे की अफगाण कमांडोने गोळ्या संपल्यानंतर तालिबानला शरण गेले. यानंतर दहशतवाद्यांनी ‘अल्ला हू अकबर’ ची घोषणाबाजी करत त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला. अफगाण सैन्यदलाचे सर्व 22 सशस्त्र कमांडो या निर्दयी हत्याकांडाचे बळी ठरले. सीएनएनच्या अहवालानुसार अफगाणिस्तानमधील फरयाब प्रांताच्या दौलताबाद भागात 16 जून रोजी हा नरसंहार करण्यात आला होता. तालिबान्यांचा शिरकाव पाहून सरकारने हा परिसर पुन्हा ताब्यात घेण्यासाठी अमेरिकेने प्रशिक्षित कमांडोची एक टीम पाठविली होती.

    दरम्यान यात निवृत्त जनरलचा मुलगा देखील होता. जेव्हा या चमूला तालिबान्यांनी घेराव घातला तेव्हा त्यांनी हवाई पाठिंबा मागितला पण त्यांना तो मिळाले नाही.

    निशस्त्र सैनिकांना तालिबानने मारले

    तालिबानचा असा दावा आहे की गोळ्या संपल्यानंतर हे अफगाण कमांडो पकडले गेले होते, परंतु प्रत्यक्षदर्शी आणि ताज्या व्हिडिओ फुटेजवरून हे नि: शस्त्र सैनिक तालिबान्यांनी ठार मारले असल्याचे दिसून आले आहे. ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर आपला हल्ला अधिक तीव्र केला आहे. तालिबानने असा दावा केला आहे की त्यांनी आता देशातील 85 भाग ताब्यात घेतला आहेत. व्हिडिओमध्ये असे दिसते आहे की अफगाण सैनिक आपले हात वर करत आहेत आणि बरेच लोक जमिनीवर पडून आहेत. या व्हिडिओमध्ये एक आवाज येत आहे ज्यामध्ये असे सांगितले जात आहे की ‘शूट करू नका. शूट करू नका मी तुझ्यापुढे दयेची भीक मागतो. त्यानंतर काही सेकंदातच तालिबानी अतिरेक्यांनी अल्लाह अकबरच्या घोषणा दिल्या आणि नि: शस्त्र सैनिकांवर गोळ्या झाडल्या.

    तसेचं दुसर्‍या व्हिडिओमध्ये सैनिकांचा मृतदेह जमिनीवर पडलेला दिसत आहे. सीएनएनने प्रत्यक्षदर्शींशी बोलल्याचा दावा केला आहे. ते म्हणतात की हे कमांडो आमर्ड व्‍हीकलमधून आले आहेत आणि त्यांनी सुमारे दोन तास तालिबानशी युद्ध केले. या दरम्यान त्याच्या गोळ्या संपल्या आणि ते अडकले. अनेकदा मदत मागितल्यानंतरही त्यांना हवाई पाठिंबा मिळाला नाही. तर इतर सैनिकांनी या कमांडोचा विश्वासघात केला.