अमेरिकीनं सैन्य मागे घेताच अफगाणिस्तानात पुन्हा तालिबानचं वर्चस्व सुरु

तालिबानचे नियम अतिशय कठोर आणि व्यक्तीस्वातंत्र्याला मारक असतात. महिलांसाठी तर त्यांचे नियम अतिशय कठोर आहेत. त्यांच्या नियमांनुसार महिला (Woman) एकट्या घराबाहेर देखील जाऊ शकत नाहीत. पुरुष जोडीदाराशिवाय बाजारात जाण्याची देखील त्यांना मनाई आहे.

    अफगानणिस्तान: अमेरिकेनं (USA) अफगाणिस्तानातून (Afghanistan) आपलं सैन्य माघारी घेण्यास सुरुवात केल्यानंतर तालिबान (Taliban) या कट्टरतावादी संघटनेनं पुन्हा तिथं आपलं वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानातील 85 टक्के भागावर तालिबाननं कब्जा केल्याचा दावा अफगाण सरकारनं केला आहे.

    तालिबानचे नियम अतिशय कठोर आणि व्यक्तीस्वातंत्र्याला मारक असतात. महिलांसाठी तर त्यांचे नियम अतिशय कठोर आहेत. त्यांच्या नियमांनुसार महिला (Woman) एकट्या घराबाहेर देखील जाऊ शकत नाहीत. पुरुष जोडीदाराशिवाय बाजारात जाण्याची देखील त्यांना मनाई आहे.

    पुरुषांसाठीही (Man) कडक नियम लागू करण्यात आले आहेत. पुरुषांना दाढी कापण्यास तसंच धूम्रपान करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कडक शिक्षा दिली जाते. त्यामुळं तालिबानचं शासन लागू झालेल्या भागांमधील महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

    तालिबान्यांनी गेल्या महिन्यात ताजिकिस्तानच्या सीमेजवळील शिर खान बंदर परिसर ताब्यात घेतला आणि स्थानिक इमामाला पत्र लिहून त्यांच्या आदेशांची माहिती देत अंमलबजावणी करण्याचा हुकुम दिला आहे. यात महिलांना घर सोडता येणार नाही असाही आदेश दिला आहे.