अमेरिकेत कोरोना औषधाची तीसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात

  • कोविड -१९ औषध LY-COV555 यावर तिसर्‍या टप्प्यातील चाचणी सुरू केली आहे. या चाचणीमध्ये युनायटेड स्टेट्स इन्स्टिट्यूट ऑफ इन्फेक्टीव्ह डिजीजसुद्धा सहभागी होत आहे. असे म्हटले जात आहे की या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत २४०० लोक भाग घेतील.

वॉशिंग्टन : कोरोना विषाणूच्या साथीमध्ये आणखी एक चांगली बातमी आली आहे. अमेरिकन औषध निर्माता एली लिलीने जाहीर केले आहे की, त्यांनी कोविड -१९ औषध LY-COV555 यावर तिसर्‍या टप्प्यातील चाचणी सुरू केली आहे. या चाचणीमध्ये युनायटेड स्टेट्स इन्स्टिट्यूट ऑफ इन्फेक्टीव्ह डिजीजसुद्धा सहभागी होत आहे. असे म्हटले जात आहे की या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत २४०० लोक भाग घेतील.

या अभ्यासामध्ये अडचणीत असलेले लोक आणि हॉस्पिटलमधील कर्मचारी उपस्थित राहतील जे नुकतेच कोरोनाहून बरे झाले आहेत. या अभ्यासामध्ये भाग घेणा्यांना LY-COV555 कोरोना विषाणूची एक डोस प्राप्त होईल. या चाचणी दरम्यान कोरोन औषध SARS-CoV-2 स्पाइक प्रोटीनविरूद्ध  एंटीबॉडी विकसित करेल.

संशोधनात असे म्हटले आहे की कोरोना विषाणू स्पाइक प्रोटीनद्वारे मानवी पेशींमध्ये घुसते. LY-COV555 औषध कोरोना विषाणू मानवी पेशींमध्ये प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करते. एली लिलीचे मुख्य वैज्ञानिक अधिकारी डॅनियल स्काऊरोन्स्की म्हणाले की नर्सिंग होममध्ये राहणाऱ्या लोकांवर कोरोना विषाणूचा फार वाईट परिणाम होत आहे. आम्ही कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी औषधावर अतिशय वेगवान काम करीत आहोत. ‘

डॅनियल म्हणाले की सध्याच्या वातावरणात क्लिनिकल चाचण्या सोपे नसतात. यानंतरही आम्ही हे आव्हान घेत आहोत जेणेकरून गरजू लोकांना मदत करता येईल. जगभरात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत सुमारे ७ लाख लोक मरण पावले आहेत. जगभरातील कंपन्या कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी लस तयार करत आहेत.