girl wearing mask

ब्रिटनमधील नागरिकांची मास्कसक्तीतून सुटका होण्याची शक्यता आहे. कोरोना निर्बंधात मास्क वापर आणि सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन करणे आवश्यक होते. आता लसीकरण मोहिमेला वेग आल्याने निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेले बहुतांश निर्बंध शिथिल करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये सुरक्षित वावर, मास्क वापरणे आणि वर्क फ्रॉम होमसह विविध उपायांबाबतचे नियम येत्या 19 जुलैपासून शिथिल केले जाण्याची शक्यता आहे. त्याबद्दलचा अंतिम निर्णय 12 जुलैला घेतला जाणार आहे.

    लंडन : ब्रिटनमधील नागरिकांची मास्कसक्तीतून सुटका होण्याची शक्यता आहे. कोरोना निर्बंधात मास्क वापर आणि सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन करणे आवश्यक होते. आता लसीकरण मोहिमेला वेग आल्याने निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेले बहुतांश निर्बंध शिथिल करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये सुरक्षित वावर, मास्क वापरणे आणि वर्क फ्रॉम होमसह विविध उपायांबाबतचे नियम येत्या 19 जुलैपासून शिथिल केले जाण्याची शक्यता आहे. त्याबद्दलचा अंतिम निर्णय 12 जुलैला घेतला जाणार आहे.

    कोरोनाची साथ रोखण्यासाठी ब्रिटनमध्ये विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लोकांनी करोनासोबत जगायला शिकले पाहिजे, असे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटले. मास्क वापर व इतर निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे.

    मात्र, मास्कचा वापर आणि सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन करण्याची सक्ती नसणार. या नियमांच्या पालनाबाबतचा निर्णय नागरिकांना घ्यायचा असून नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कोणतीही कारवाई होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.