नव्या विषाणूपासूनही संरक्षण करेल लस ; ‘या’ कंपनीने व्यक्त केला विश्वास

ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूपासून आपली लस सुरक्षा प्रदान करेल अशी आशा अमेरिकन बायोटेक कंपनी मॉडर्नाने व्यक्त केली आहे. रॉयटर्सने याबाबत वृत्त दिले आहे.

ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूपासून आपली लस सुरक्षा प्रदान करेल, अशी आशा अमेरिकन बायोटेक कंपनी मॉडर्नाने व्यक्त केली आहे. रॉयटर्सने याबाबत वृत्त दिले आहे. मॉडर्ना आयएनसीने म्हटले की, “ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या कोविड-१९ विषाणूपासून आमची लस रोगप्रतिकारशक्ती वाढवेल अशी आम्हाला आशा आहे. कोरोनाच्या कोणत्याही नव्या विषाणूशी लढण्याची क्षमता तपासण्याची वेगळी चाचणी करण्याचाही कंपनीचा विचार आहे. कोरोनाचा नवा विषाणू आढळून आल्यानंतर इंग्लंडमध्ये कडक कोरोना प्रतिबंधक लावण्याचा विचार असल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटले होते, त्यानंतर मॉडर्नाने यासंदर्भात भाष्य केले आहे.