धक्कादायक! मद्यपान करण्यासाठी खिडकी उघडली अन चौदाव्या मजल्यावरून खाली पडली १ वर्षाचा मुलगा ; मद्यधुंद आई वडिलांना मुलाचा मृत्यू झालेला देखील कळला नाही

या मुलाच्या पालकांचे वय २१ आणि २३ वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. त्यांचा मुलगा खिडकीतून खाली पडला तेव्हा ते दोघे मद्यपान करीत असल्याचा पुरावा असल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकरणाची चौकश रशियन अन्वेषण समितीने स्वतःकडे घेतली आहे. या दुर्दैवी घटनेननंतर त्यांनी एक महत्वाची सूचना जारी केली असून, टोलेजंग इमारतीत राहणाऱ्या पालकांना मुलांबाबत योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

  स्वतःच्या मुलांबद्दल पालक नेहमीच जागरूक असतात. त्यांना कल्पना असते की, अगदी थोडासा निष्काळजीपणा देखील महागात पडू शकतो . मात्र असे असले तरी काही पालक हे  निष्काळजीपणाने वागताना पाहायला मिळतात. असाच एक प्रकार रशियामध्ये घडला आहे. येथील एक जोडपे दारू पिण्यात इतके गुंग होते की,  त्यांचे १ वर्षाचे मूल १४ व्या मजल्यावरील खिडकीतून खाली पडले हे देखील त्यांना समजले नाही. जेव्हा पोलिसांनी दरवाजा ठोठावला आणि मृतदेह त्यांच्या स्वाधीन केला तेव्हा या जोडप्यास आपल्या मुलाच्या मृत्यूची माहिती मिळाली.

  नेमके काय घडले?
  रशियामध्ये मद्यपान करताना जोडप्याने एक अक्षम्य असा निष्काळजीपणा केला आहे की त्यामुळे त्यांना त्यांचे १ वर्षाचे मूलं गमवावे लागले. या जोडप्याने नशा करण्यासाठीत्यांच्या मुलाच्या पलंगालगतची खिडकी उघडली होती. या दरम्यान, हे मुल बेडवर खेळत असताना १४ व्या मजल्यावरून खाली पडले.आणि धक्कादायक प्रकार म्हणजे जेव्हा पोलिसांनी दाराची बेल वाजवून त्या मुलाचा मृतदेह या जोडप्याच्या हातात सोपविला तेव्हा त्यांना मुलाच्या खाली पडल्याची माहिती मिळाली.

  निष्काळजीपणामुळे पोलिसांनी केली अटक
  डेली मेलच्या वृत्तानुसार रशियाची राजधानी मॉस्को येथील अलेक्झांडर आणि तैसिया अकिमोव्ह यांना मुलगा टिमोफेच्या निष्काळजी मृत्यूच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दोषी ठरल्यास या जोडप्याला किमान दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. रशियन कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या संस्थांचा असा विश्वास आहे की हे मूल १४व्या मजल्यावरील टॉवर ब्लॉक विंडोमधून पडले आहे.

  घटनेच्या वेळी पालक मद्यपान करत होते