अंटार्टिकात आढळलेले फुटबॉलच्या आकाराचे अंडे जगातील सर्वात जुने जीवाश्म

२०११ मध्ये चिलीच्या शास्त्रज्ञांच्या गटाने अंटार्क्टिकामध्ये फुटबॉलच्या आकाराचे एक रहस्यमय जीवाश्म शोधून काढले आणि त्यास 'द थिंग' असे नाव दिले. हे जीवाश्म चिलीच्या संग्रहालयात ठेवले होते. हे

 
२०११ मध्ये चिलीच्या शास्त्रज्ञांच्या गटाने अंटार्क्टिकामध्ये फुटबॉलच्या आकाराचे एक रहस्यमय जीवाश्म शोधून काढले आणि त्यास ‘द थिंग’ असे नाव दिले. हे जीवाश्म चिलीच्या संग्रहालयात ठेवले होते. हे जीवाश्म मऊ-आवरणाचे अंडे असल्याचे आढळले आहे. याचे वय साधारण ६८  दशलक्ष वर्षांपूर्वीचे आहे. हे जगातील दुसर्‍या क्रमांकाचे अंडी आहे ,हे अंडे लुप्त पावलेल्या समुद्री सापाचे  किंवा सरड्याचे अंड असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
 
 
शास्त्रज्ञांनी ८-९  वर्षांपासून हे रहस्य सोडविण्याचा प्रयत्न केला. २०१८  मध्ये, एक जीवाश्मशास्त्रज्ञाने असे सुचवले की ते अंडी असू शकते, परंतु एका स्कॅनवरून असे दिसून आले की अंड्यात सांगाडे नव्हते. हे अंड अंटार्क्टिकाच्या सेमौर बेटावर सापडले होते. वैज्ञानिकांचे असे मत आहे की हे जीवाश्म डायनासोरच्या काळात मोसासौर नावाच्या सागरी सरपटणाऱ्या प्राण्याचे आहे. हे जगातले द्वितीय क्रमांकाचे सर्वात मोठे अंड आहे. ६८ दशलक्ष वर्षांपूर्वी अंटार्क्टिक समुद्रात राहणारे राक्षशी आकाराचे सरडे होते. डायनासोर नामशेष होण्याबरोबरच मोनासौर देखील नामशेष झाला.
 
 
चिली विद्यापीठाच्या जीवशास्त्र विभागाच्या अलेक्झांडर वर्गास म्हणतात, “हा एक मोसॉसॉर आहे अशी गृहीत धरल्यासआपण सध्याच्या सरडे आणि त्यांच्या अंडी आणि त्यांचे प्रौढ शरीराचे आकार यांच्यातील अस्तित्वातील संबंधांचा अभ्यास करू शकतो. या अंदाजानुसार हा प्राणी कमीतकमी सात मीटर ते १ मीटर उंच (२ ते ५६ फूट) उंच होता. म्हणूनच, तो खरोखर एक राक्षशी ठरू शकतो. "