नोकरी मिळाली नाही म्हणून युवकाने शहरात लावली ‘प्लीज हायर मी’ची होर्डिंग्स, पाहा…

आयर्लंडमधील ख्रिस हर्किन नावाच्या तरुणाने अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला होता, पण कुठेही नोकरी मिळाली नाही. हर्किनला एका आठवड्यात ३०० ठिकाणी नकार मिळाला. पण त्याला अशी कल्पना सुचली, त्यानंतर तो भलताच चर्चेचा विषय ठरला आहे.

  नोकरीसाठी लोक रात्रंदिवस मेहनत करतात. किती लोक नोकरीच्या शोधात आहेत? दुसरीकडे, जेव्हा त्यांना नोकरी मिळत नाही तेव्हा ते निराश होतात. त्यामुळे अनेकजण काही चुकीची पावले उचलतात. पण एका तरुणाने असे पाऊल उचलले आहे ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही.

  आयर्लंडमधील ख्रिस हर्किन नावाच्या तरुणाने अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला होता, पण कुठेही नोकरी मिळाली नाही. हर्किनला एका आठवड्यात ३०० ठिकाणी नकार मिळाला. पण त्याला अशी कल्पना सुचली, त्यानंतर तो भलताच चर्चेचा विषय ठरला आहे.

  २०१९ पासून आहे बेरोजगार

  एका इंग्रजी वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, ख्रिस हर्किन यांना नोकरी न मिळाल्याने ते अस्वस्थ होते. अशा परिस्थितीत त्यांनी शहरात नोकरीसाठी होर्डिंग लावले. ज्यासाठी त्याने सुमारे ४० हजार रुपये खर्च केले. होर्डिंगमध्ये ख्रिसने त्याच्या फोटोसह ‘प्लीज हायर मी’ लिहिले.तसेच त्याने असे लिहिले आहे की तो पदवीधर आणि अनुभवी लेखक आहे. २४ वर्षीय ख्रिस हर्किन २०१९ पासून बेरोजगार आहेत.

  पाहा व्हिडिओ :

  कशी सुचली कल्पना?

  ख्रिसला होर्डिंग लावण्याची कल्पना त्याच्या बहिणीशी झालेल्या संभाषणादरम्यान आली. ती एक सोशल मीडिया मॅनेजर आहे. त्याची बहीण जाहिरात मोहिमेसाठी होर्डिंगवर काम करत होती.

  देशभरात होतेय होर्डिंग्जची चर्चा, तरीही नोकरी नाही

  नोकरी मिळवण्यासाठी ख्रिसने संपूर्ण शहरात होर्डिंग लावल्यानंतर देशभरात ठळक बातम्या आल्या. ऑनलाइन साईट मिररनुसार, ख्रिसने होर्डिंग्जवर मोठ्या अक्षरात लिहिले आहे – ‘प्लीज हायर मी’. या बिलबोर्डमध्ये तो त्याच्या कौशल्यांबद्दल आणि युएसपीबद्दल बोलतो. ख्रिसच्या या कल्पनेनंतर त्याला प्रसिद्धी मिळाली पण त्याला अजूनही नोकरी मिळालेली नाही.