india and china

भारताने तैवानची नाही तर विक्राळ होत चाललेल्या कोरोना महामारीची चिंता करावी अशा उलट्या बोंबा ग्लोबल टाईम्सने मारल्या आहेत. भारतात जेव्हा अंतर्गत संकटे उद्भवतात तेव्हा तो चीनचे नाव घ्यायला आणि तणाव वाढवायला सुरुवात करतो. कारण लोकांचा लक्ष त्यावरून दुसरीकडे नेता येईल. भारत एक उच्च क्षमतेचा विकासशील देश व्हायला हवा. कोरोना महामारीमध्ये भारत इतर जगापेक्षा जास्त लस बनवत आहे. मात्र, दुर्दैवाने तो दुसऱ्यांच्या विषयात पडून स्वत:चे नुकसान करत आहे, असे म्हटले आहे.

    बिजींग : भारतात तैवानच्या मुद्यावर चर्चा होत असेल तर ते चीनला खपत नाही. चिनी सरकारच्या वृत्तपत्राने एका लेखात भारताला सरळसरळ धमकी दिली आहे. तैवानला समर्थन दिल्यास भारताला नुकसान पोहोचविण्याचे आमच्याकडे अनेक पर्याय असल्याची धमकी तिळपापड झालेल्या चीनने दिला आहे. शांघाय इंस्टिट्यूट्स फॉर इंटरनॅशनल स्टडीजचे रिसर्च सेंटर फॉर चायना-साउथ एशिया कोऑपरेशनचे सचिव जनरल लियू जॉन्गयी यांच्या हवाल्याने दावा केला आहे. चीन भारताच्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये बंडखोरांना समर्थन देऊ शकतो, असे म्हटले आहे.
    फुटीरवाद्यांना देणार समर्थन

    ग्लोबल टाईम्सनुसार दोन्ही देशांच्या द्विपक्षीय करारानुसार एकमेकांच्या क्षेत्रिय अखंडतेचा सन्मान करणे लिहिलेले आहे. तैवानला वेगळा देश समजणे हे या करारचे उल्लंघन आहे. अशात दिल्लीला बिजींगबाबत कोणतेही वक्तव्य करणे टाळायला हवे. लियूने ग्लोबल टाईम्समध्ये म्हटले की, आम्ही सिक्किमला भारताचे राज्य नाही असे मानू शकतो. जर भारत चीनमधील विद्रोहींच्या कृत्याचे समर्थन करत असेल तर चीन डोळ्यांच्या बदल्यात डोळा या उक्तीप्रमाणे पूर्वोत्तरेतील भारतद्रोही शक्तींना, फुटीरतावाद्यांना चीन समर्थन देईल.