There is a tribal community in the Kunain province of northern Namibia in Africa. Women from this community called ‘Himba’ are not allowed to take bath

या महिला आंघोळ करीत नसल्या तरी आपल्या देहाला विशिष्ट वनौषधींचा लेप लावतात. त्यामुळे त्यांची त्वचा निरोगी व सुगंधित राहते. या समुदायात 50 हजार लोक आहेत. समुदायाचे काही नियम भलतेच विचित्र आणि कडक आहेत. समुदायातील स्त्रियांना केवळ आंघोळीचीच बंदी आहे असे नव्हे, तर त्यांना हात धुण्यासाठीही पाणी वापरता येत नाही.

    नैरोबी : आफ्रिकेतील उत्तर नामिबियाच्या कुनैन प्रांतात एक आदिवासी समुदाय आहे. ‘हिम्बा’ नावाच्या या समुदायातील महिलांना आंघोळ करण्याची परवानगी नसते. मात्र, तरीही या समुदायातील महिलांना आफ्रिकेतील सर्वात सुंदर महिला मानले जाते.

    या महिला आंघोळ करीत नसल्या तरी आपल्या देहाला विशिष्ट वनौषधींचा लेप लावतात. त्यामुळे त्यांची त्वचा निरोगी व सुगंधित राहते. या समुदायात 50 हजार लोक आहेत. समुदायाचे काही नियम भलतेच विचित्र आणि कडक आहेत. समुदायातील स्त्रियांना केवळ आंघोळीचीच बंदी आहे असे नव्हे, तर त्यांना हात धुण्यासाठीही पाणी वापरता येत नाही.

    मात्र, त्यांनी स्वतःला स्वच्छ ठेवण्यासाठी पाण्याला पर्याय शोधला आहे. यासाठी त्या खास जडीबुटीचा वापर करतात. ही वनौषधी पाण्यात उकळून त्याच्या वाफेचे स्नान त्या करतात. या वनौषधी सुगंधित असल्याने या वाफेच्या स्नानाने त्यांच्या शरीरालाही सुगंध येतो. या मार्गामुळे आता त्यांनाही पाण्याच्या आंघोळीची गरज वाटत नाही.