पुढे धोका आहे… ‘या’ बागेत एकट्याने शिरकाव केल्यास पुन्हा जिवंत येणे कठीण, काय आहे या मागचं रहस्य ?

गाच्या पाठीवर एक बाग अशी आहे. जिथे एकटा-दुकटा गेलेला माणूस त्या बागेत गेला. तर, जिवंत परत येऊच शकत नाही. या बागेत रंगीबेरंगी झाडे, मॅनिक्योर केलेले टॉपियर, सुगंधी गुलाब आणि कॅस्केडिंग कारंजे आहेत. जे पर्यटकांना आकर्षित करतात. मात्र तिथे कोणत्याही झाडांना स्पर्श करणे किंवा वास घेण्यास सक्त मनाई आहे.

लंडन : हिरवी झाडे, डोंगर, पशु-पक्षी आणि शुद्ध हवा या निसर्गाच्या रमणीय वातावरणात आपले मन तृप्त होऊन जाते. त्याचप्रमाणे बाग-बगीचे किंवा गार्डन (Garden) यांसारख्या ठिकाणी सुद्धा भान हरपून जाते. तन-मनाच्या आरोग्य लाभासाठी अनेक लोक बागेत जातात. कारण या वातावरणामुळे शरीरात नव्या प्रकारची ऊर्जा येते. थकलेलं शरीर पुन्हा एकदा नव्या दिशेने धावायला लागतं. परंतु जगाच्या पाठीवर एक बाग अशी आहे. जिथे एकटा-दुकटा गेलेला माणूस त्या बागेत गेला. तर, जिवंत परत येऊच शकत नाही.

या सर्व गोष्टी आपण सिनेमा आणि पुस्तकामध्ये बऱ्याचदा वाचतो. परंतु या रहस्यमय बागेचे नावही ‘द अल्नविक पॉईझन गार्डन’ (The Alnavic Poison Garden) असं आहे. उत्तर इंग्लंडमधील नॉथंबरलँड (Northumberland in northern England)  येथे ही बाग आहे. ही जगातील सर्वात खतरनाक बाग आहे. त्यामुळे या बागेत फिरताना आपल्यासोबत एक गार्ड असावा लागतो.

जर आपण एकटे बागेत गेलो तर…

आपल्यासोबत एखादी व्यक्ती आणि गार्ड असणे जरूरीचे आहे. कारण एकटा माणूस या बागेत फिरायला गेला तर, पुन्हा परत जिवंत येण्याची श्वासती नसते. या बागेत रंगीबेरंगी झाडे, मॅनिक्योर केलेले टॉपियर, सुगंधी गुलाब आणि कॅस्केडिंग कारंजे आहेत. जे पर्यटकांना आकर्षित करतात. मात्र तिथे कोणत्याही झाडांना स्पर्श करणे किंवा वास घेण्यास सक्त मनाई आहे.

काय आहे यामागील कारण?

ही बाग जवळपास १४ एकर जागेवर पसरली आहे. त्यामुळे या बागेत सुमारे ७०० विषारी वनस्पती आहेत. येथील सर्व गार्डन आणि वनस्पतींची माहिती गार्ड देतो. असे समजले जाते की, या विषारी वनस्पतींचा वापर शाही शत्रूंचा काटा काढण्यासाठी केला जात होता.