This is a robot, serving Corona patients without taking any leave

अमेरिकेमध्ये कमी आर्थिक उत्पन्न असणाऱ्या लोकांवर उपचार करण्यासाठी नॉर्थ ह्यूस्टनमधील युनायटेड मेमोरियल येथे छोटे रुग्णालय आहे. येथे रुग्णांना सेवा देणारे मुख्य डॉक्टर डॉ.जोसेफ व्हॅरॉन यांचे त्यांनी दिलेल्या सेवेमुळे जगभरात कौतुक होत आहे.

वॉशिंग्टन : जगभरात कोरोना विषाणूने (Corona Virus) हाहाकार घातला आहे. त्यामुळे जगात कोरोना रुग्णांचा (Corona patients)  आकडा वाढला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना (Doctor) दिवसरात्र सेवा पुरवावी लागत आहे. अमेरिकेतील नॉर्थ ह्यूस्टनमधील युनायटेड मेमोरियल येथील रुग्णालयातील डॉक्टर. जोसेफ व्हॅरॉन यांनी मागील २६८ दिवसांपासून एकही सुट्टी न देता कोरोना रुग्णांना सेवा दिली आहे.

अमेरिकेमध्ये कमी आर्थिक उत्पन्न असणाऱ्या लोकांवर उपचार करण्यासाठी नॉर्थ ह्यूस्टनमधील युनायटेड मेमोरियल येथे छोटे रुग्णालय आहे. येथे रुग्णांना सेवा देणारे मुख्य डॉक्टर डॉ.जोसेफ व्हॅरॉन यांचे त्यांनी दिलेल्या सेवेमुळे जगभरात कौतुक होत आहे. नुकताच एका डॉक्टरने कोरोना रुग्णाला मिठी मारल्याचा फोटो व्हायरल झाला होता. तो फोटो डॉ. जोसेफ व्हॅरॉन यांचा होता. हा फोटो प्रचंड व्हायरल झाल्यनंतर एका वृत्तसंस्थेने जोसेफ यांची मुलाखात घेतली होती. या मुलाखतीत असे समजले की, डॉ. जोसेफ सलग २६० व्या दिवशी कामावर हजर राहून कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. तसेच ते घरी परतल्यावरही फोनद्वारे कोरोना रुग्णांच्या उपचारासंदर्भात बोलण्यातच जातो असे डॉ. जोसेफ यांनी सांगितले आहे.

तसेच रविवारी सलग २६८ व्या दिवशीही डॉ. जोसेफ हे रुग्णालयात हजर होते. डॉ. जोसेफ यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना खाण्यापिण्यासाठीही पुरेसा वेळ नसतो. त्यामुळेच जेव्हा कोणी त्यांना काही खाण्याच्या पदार्थांची ऑफर करतं म्हणजे, खाण्याचे पदार्थ देतं तेव्हा ते त्याचा आनंदाने स्वीकार करतात. मिळेल ते मिळेल त्यावेळी खाल्ल्याने मागील काही काळामध्ये माझं वजन १५ किलोंनी वाढलं आहे, असं डॉ. जोसेफ हसतहसतच सांगतात.

करोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे डॉ. जोसेफ यांनी जुलै महिन्यामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, मी आणि माझे कर्मचारी सतत काम करुन खूप थकलो आहोत, असं म्हटलं होतं. रुग्णालयातील नर्सने एवढ्या वेळ काम केलं आहे की त्या पूर्णपणे थकल्या आहेत. त्या एवढ्या थकल्यात की आता त्यांना कोणत्याही क्षणी रडू येईल. करोना संसर्गाच्या कालावधीमध्ये स्वस्तात उपचार पुरवणाऱ्या या रुग्णालयामध्ये जेवढे रुग्ण दाखल झालेत सर्वांवर योग्य उपचार करण्यासाठी येथील कर्मचाऱ्यांनी न थकता दिवस रात्र काम केलं आहे. मात्र आता हे काम खूप जास्त प्रमाणात असल्याने कर्मचाऱ्यांनाही थकवा आल्याचं डॉ. जोसेफ म्हणाले होते.

डॉ. जोसेफ ज्या रुग्णालयात सेवा देत आहेत. ते रुग्णालय कोरोना रुग्णांनी खचाखच भरले आहे. येथे रोज नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत असते. त्यामुळे रुग्णालयातील सर्व बेड हे नेहमी भरलेले असतात. जोसेफ रोज कोरोना वॉर्डला भेट देऊन रुग्णांवर उपचार करतात. कोरोना रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांना पीपीई कीट घालावा लागतो. यामुळे रुग्णाशी थेट संवाद साधण्यात अडथळा येतो. म्हणून डॉ. जोसेफ यांनी रुग्णालयातील सर्व डॉक्टरांना आपापला फोटो पीपीई कीटवर लावण्यास सांगितले. जेणेकरुन कोरोना रुग्णांना समजेल की कोणता डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहे.