vaccine corona virus

कोरोना विषाणूवरील लस (corona virus vaccine) तयार करणाऱ्या मॉडर्ना कंपनीने वृद्धांवर केलेल्या परीक्षणाचे उस्ताहवर्धक रिझल्ट मिळाले आहेत. या लसीमुळे वृद्ध रुग्णांमध्येही प्रतिकारशक्ती निर्माण होते.

अमेरिकेच्या मॉडर्ना ( Moderna) कंपनीने तयार केलेल्या कोरोना विषाणूच्या लसीसंदर्भात एक चांगली बातमी दिली आहे. कोरोना विषाणूवरील लस (corona virus vaccine) तयार करणाऱ्या मॉडर्ना कंपनीने वृद्धांवर केलेल्या परीक्षणाचे उस्ताहवर्धक रिझल्ट मिळाले आहेत. या लसीमुळे वृद्ध रुग्णांमध्येही प्रतिकारशक्ती निर्माण होते.

या चाचणीत ५६ ते ७० वर्षे वयोगटातील १० आणि ७१ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या १० लोकांचा समावेश असल्याचे मॉडर्ना कंपनीने बुधवारी सांगितले. कोरोना विषाणूच्या प्रतिकारशक्तीसाठी या अँटीबॉडीज आवश्यक असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. स्वयंसेवकांमध्ये आढळलेल्या अँटीबॉडीजचे प्रमाण कोरोनामधून बरे झालेल्या रूग्णांपेक्षा जास्त होते. असे कंपनीचे म्हणणे आहे.

मॉडर्ना कंपनीच्या मते, लसीचे डोस घेत असलेल्या लोकांमध्येही कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसले नाहीत. काही रूग्णांनी डोकेदुखी आणि थकवा असल्याची तक्रार केली पण हे सौम्य दुष्परिणाम दोन दिवसातच संपले. तर अमेरिकेत बऱ्याच कोरोना लसीवर काम सुरू आहेत. यापूर्वी कंपनीने याच परिक्षणाच्या डेटावरून सिद्ध केले होते की, ही लस तरूणांमध्ये कोरोना विषाणूविरोधात अँटीबॉडी तयार करत आहे. मात्र त्याचा परिणाम वृद्धांना सर्वाधिक होत असल्यामुळे त्यांच्यासाठी ही लस परिणामकारक ठरू शकेल.