‘हा’ आहे खऱ्या आयुष्यातला मोगली; जाणून घ्या कसा जगतो हा जंगलातले आयुष्य

लोक त्याच्यासोबत भेदभाव करत असल्याने तो आपला अधिक वेळ जंगलातच घालवतो. त्याचमुळे लोकांनी त्याला खऱ्या आयुष्यातील मोगली म्हणणे सुरु केलं

जंगल बूक नावाचे कार्टून अनेकांनी आपल्या लहानपणी पहिले असेल, याशिवाय मोगली नावाचा हॉलीवूडचा चित्रपटही मधल्या काळात गाजला. असाच एक मुलगा जंगलात राहून आपले जीवन व्यतीत करत असल्याचे समोर आले आहे. मानसाला वाटतं की सर्वजण त्यांच्याप्रमाणेच असावेत. कोणी आपल्यापेक्षा वेगळं दिसलं किंवा वेगळं वागू लागलं की त्यांच्या पचनी पडत नाही. पूर्व आफ्रिकेतील रवांडामध्ये एका २१ वर्षीय मुलाला डिसऑर्डर आहे, याला microcephaly म्हणतात. यामुळे एखाद्याचे तोंड मोठे होते. याच कारणामुळे आजूबाजूचे लोक त्याला खऱ्या आयुष्यातील मोगली म्हणतात.

हे डिसऑर्डर Ellie ला लहानपणापासूनच आहे. त्यामुळे तो सर्वांपेक्षा वेगळा दिसतो. लोक त्याच्यासोबत भेदभाव करत असल्याने तो आपला अधिक वेळ जंगलातच घालवतो. त्याचमुळे लोकांनी त्याला खऱ्या आयुष्यातील मोगली म्हणणे सुरु केलं आहे, Ellie ने जंगलात राहून अनेक प्रकारच्या ट्रिक्स शिकल्या आहेत. तो कित्येक किलोमीटर पायी चालू शकतो. झाडावर तो एखाद्या माकडाप्रमाणे चढतो.