‘This’ queen was bathing in blood to look beautiful; Murder of more than 600 young women

इतिहासात डोकावले तर अशा कितीतरी घटना आणि रहस्ये दडून आहेत ज्याबाबत वाचून थक्क व्हायला होते. आज आम्ही तुम्हाला एका विचित्र राणीची गोष्ट सांगणार आहोत. या राणीच्या अमानवीय कारनाम्यांमुळे लोक तिला घाबरून होते. ही राणी एक सीरीअल किलरही होती. तसे तर तुम्ही अनेक सीरीअर किलरबाबत ऐकले असेल. परंतु, या राणीचे कारनामे वाचून अंगावर शहारे येऊ शकतात. ही राणी अविवाहित तरूणींना मारून त्यांच्या रक्ताने आंघोळ करत होती. हंगरीच्या या राणीचे नाव एलिजाबेथ बाथरी होते.

    दिल्ली : इतिहासात डोकावले तर अशा कितीतरी घटना आणि रहस्ये दडून आहेत ज्याबाबत वाचून थक्क व्हायला होते. आज आम्ही तुम्हाला एका विचित्र राणीची गोष्ट सांगणार आहोत. या राणीच्या अमानवीय कारनाम्यांमुळे लोक तिला घाबरून होते. ही राणी एक सीरीअल किलरही होती. तसे तर तुम्ही अनेक सीरीअर किलरबाबत ऐकले असेल. परंतु, या राणीचे कारनामे वाचून अंगावर शहारे येऊ शकतात. ही राणी अविवाहित तरूणींना मारून त्यांच्या रक्ताने आंघोळ करत होती. हंगरीच्या या राणीचे नाव एलिजाबेथ बाथरी होते.

    एएलिजाबेथ बाथरीला इतिहासातील सर्वात खतरनाक आणि निर्दयी सीरिअल किलर म्हणून ओळखले जात होते. 1585 ते 1610 दरम्यान बाथरीने 600 पेक्षा जास्त तरूणींची हत्या करून त्यांच्या रक्ताने आंघोळ केली होती. असे म्हटले जाते की, एलिजाबेथला तिचे सौंदर्य कायम ठेवण्यासाठी अविवाहित तरूणींच्या रक्ताने आंघोळ करण्याचा सल्ला देण्यात आला होता.

    एलिजाबेथला हा प्रकार इतका आवडला की, तिने क्ररतेची सीमा पार केली. सीरिअल किलर एलिजाबेथ तरूणींना मारल्यानंतर त्यांच्यासोबत अमानवीय कृत्य करत होती. काही कथांनुसार, ती मृत तरूणींचे मांस आपल्या दातांनी तोडत होती. सांगितले असेही जाते की, एलिजाबेथ बाथरीच्या या कृत्यात तिचे तीन नोकरही तिला साथ देत होते. एलिजाबेथ ही हंगरीच्या राजघराण्यातील होती.

    एलिजाबेथचे लग्न फेरेंक नॅडेस्की नावाच्या एका व्यक्तीसोबत झाले होते. तो युद्धात तुर्कांविरोधात लढला होता. त्यामुळे तो नॅशनल हिरो होता. तरूणींना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी एलिजाबेथ खूप काही करायची. ती आजूबाजूच्या गावातील मुलींना महालात चांगले पैसे देऊन काम करण्यासाठी बोलवत होती. आणि त्यांना आपली शिकार बनवत होती.