आश्चर्यजनक ! हा वाघ काढतो माकड आणि पक्ष्यांचे आवाज ; पाहा व्हिडिओ

प्राणिसंग्रहालयाने हा व्हिडिओ खरा असण्याची पुष्टी केली आहे. या वाघाचा आवाज तयार करण्यात आलेला नाही. या वाघाचा जन्म जून २०२० च्या सुरुवातीस पालक शेरखान आणि बघेरा यांच्या चार मुलांसमवेत झाला होता

  आत्तापर्यंत माणसांना तुम्ही पक्ष्यांचे, प्राण्यांचे आवाज काढताना पहिले असेल. परंतु जर तुम्हाला सांगितले कि हि किमया फक्त माणसांनाच नाहीतर प्राण्यांनाही साधता येते तर तुम्हाला आश्चर्य वाटेल.. पण हे खरं आहे. एक वाघ गर्जना तर करतोच मात्र त्याचबरोबर चक्क वानर आणि पक्ष्यांचा आवाज काढतो. हा वाघ बरनाउलमध्ये प्राणिसंग्रहालयात आहे. त्याच वय अवघ ८ महिने असून त्याचा विविध आवाज काढण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

   

  सायबेरियन टाईम्सकडून शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओ शावक हाईपीचवर पक्ष्यांचा आवाज आणि वानराचा आवाज काढताना दिसत आहे. प्राणीसंग्रहालयात वाघाचे हे पिल्लू वेगवेगळे आवाज काढण्यासाठी प्रसिद्ध आहे. हा वाघ कधी माकडांचा आवाज तर कधी पक्ष्यांच्या किलबिलाटांचा आवाज काढतो. आईचे लक्ष वेधण्यासाठी हे शावक असे आवाज काढतो. या वाघाचा आवाज ऐकून तुम्हाला वाटेल की, त्याच्या गळ्यात अडचण आहे. पण तसे नाही, त्याचा घसा अगदी बरोबर आहे. बर्ड हाऊसच्या पोस्टनुसार, हा शावक जन्मानंतरचं असे आवाज करतो. तो आपल्या आईचे लक्ष विचलित करण्यासाठी असे आवाज काढतो.

  प्राणिसंग्रहालयाकडून व्हिडिओ खरा असण्याची पुष्टी
  प्राणिसंग्रहालयाने हा व्हिडिओ खरा असण्याची पुष्टी केली आहे. या वाघाचा आवाज तयार करण्यात आलेला नाही. या वाघाचा जन्म जून २०२० च्या सुरुवातीस पालक शेरखान आणि बघेरा यांच्या चार मुलांसमवेत झाला होता. अमूर वाघ ही जगातील सर्वात मोठी मांजर प्रजाती आहे.