हाय रे गर्मी! यंदाच्या वर्षात उष्णतेचा पारा वाढला, थंडीलाही टाकलं मागे

यूरोपीय यूनियनच्या (European Union) उपग्रह नियंत्रणाखालील सेवा कॉपरनिकस क्लाईमेट चेंज सर्व्हिसच्या (Copernicus Climate Change Service) वैज्ञानिकांनी एका अहवालात खुलासा केला आहे की, नोव्हेंबर २०२० मध्ये वैश्विक तापमान (Temperature) २०१६ आणि २०१९ च्या तुलनेत ०.१ डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त आहे. तसेच १९८१ ते २०१० अशा ३० वर्षांच्या काळात सुद्धा ०.८ डिग्री सेल्सिअस गर्मी जास्त आहे.

भारतात नोव्हेंबर (November) महिन्यातच थंडीची चाहूल लागते. परंतु यंदाच्या वर्षात कोरोनासोबतच (Corona) सगळं काही कायापालट झाल्यासारखं दिसतयं. थंडी म्हटली की, अंगावर स्वेटर, कानटोपी यांसारख्या वस्तूंची गरज पटकनं लागते. परंतु यंदाच्या वर्षात गर्मीने (summer) तीव्र रूप धारण केल्यासारखं वाटत आहे. यूरोपीय यूनियनच्या (European Union) उपग्रह नियंत्रणाखालील सेवा कॉपरनिकस क्लाईमेट चेंज सर्व्हिसच्या (Copernicus Climate Change Service) वैज्ञानिकांनी एका अहवालात खुलासा केला आहे की, नोव्हेंबर २०२० मध्ये वैश्विक तापमान (Temperature) २०१६ आणि २०१९ च्या तुलनेत ०.१ डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त आहे. तसेच १९८१ ते २०१० अशा ३० वर्षांच्या काळात सुद्धा ०.८ डिग्री सेल्सिअस गर्मी जास्त आहे.

वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर युरोपमधून साईबेरिया आणि आर्कटिक सागर पर्यंत तापमानाची शक्यता अधिक आहे. यंदाच्या वर्षातील तापमान २०१६ च्या तुलनेत एकसमान आहे. डिसेंबर महिन्यात तापमान जास्त वेळ राहणार नाही, असं एजेंसीचे डायरेक्टर कार्लो बूनटेम्पो यांनी सांगतिले आहे.

सप्टेंबर महिन्यात जगभरात थंडीचा वर्षाव सुरू झाला होता. मागील तीन वर्षांपेक्षा २०२० मध्ये सर्वाधिक गर्मी होण्याची शक्यता आहे. तसेच ला-नीनाचा कूलिंग इफेक्ट सुद्धा गर्मीला संपवण्यासाठी पर्याप्त नाहीये. असं सेक्रेटरी-जनरल पेटेरी टालस यांनी सांगितलं आहे.

पहिल्यांदाच आर्कटिक सागरमध्ये नोव्हेंबर महिन्यात बर्फ जमा होतो. परंतु त्याचीही गती कमी झाल्यासारखी दिसत आहे. याचाच अर्थ बर्फ विरघळणे ही प्रक्रिया तप्त गर्मीमुळे सुरू होईल. प्रचंड गर्मीमुळे बर्फ विरघळायला लवकर सुरूवात होईल.