“ती लोकं खूप क्रूर आहेत.. महिलांना मारून त्यांच्या शरीराचे तुकडे कुत्र्यांना खाऊ घालतात” ; पीडित महिलेने सांगितली तालिबानची  क्रुरता

तालिबान महिलांसोबत अतिशय क्रुरपणे वागते. तालिबानी महिलांच्या शरीराचे तुकडे कुत्र्यांना खाऊ घालतात. मी नशीबवान आहे, की मी यातुन वाचले. अफगाणिस्तानात तालिबानच्या अधिपत्याखालीच रहावे लागते. येथे महिला, मुलं आणि अल्पसंख्यकावर काय काय अत्याचार केले जातात, याची कल्पना करणेही अवघड आहे

  काबुल : तालिबान्यांनी काबुल ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या पहिल्या अधिकृत पत्रकार परिषदेमध्ये महिलांच्या हक्कांचे (Women’s rights) संरक्षण करण्याचे सूतोवाच केले आहे. काबूलमधील(Kabul) प्रेसिडेंशियल पॅलेसमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी महिलांच्या हक्कांचे संरक्षण “इस्लामिक कायद्याच्या मर्यादेत” केले जाईल असे प्रतिपादन केले.मात्र असे असले तरी येथील महिला तालिबानच्या निर्णयाबाबत साशंक आहेत.अफगानातील तालिबानच्या हल्ल्यातून जीव वाचलेल्या एका पीडित महिलेने तालिबानच्या क्रुरतेविषयी माहिती दिली आहे ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल.
  कुत्र्यांना खायला दिले जाते महिलांच्या शरीराचे तुकडे
  येथिल एका पीडित  महिलेने तालिबानच्या क्रूरतेचे उदाहरण दिले आहे. तालिबानी शिक्षेत महिलांना मारून कुत्र्यांना खाऊ घातले जाते, असा खळबळजनक दावा या महिलेने केला आहे. अफगाणिस्तानच्या गझनी प्रांतात गेल्या वर्षी तालिबानच्या दहशतवाद्यांनी ३३ वर्षीय खतेरा यांना गोळी घातली होती. या हल्ल्यात त्या थोडक्यात जीवंत बचावल्या. खतेरा यांनी सांगितले, की ‘तालिबानच्या दृष्टीने, महिला केवळ मासाचा पुतळा आहे, ज्यांच्यात जीव नाही, त्यांना केवळ मारहाण केली जाते.’ अशी त्यांची मानसिकता असल्याचे त्यांनी म्हटले.
  पीडित महिलेची आपबिती
  पीडित महिलेने पुढे सांगितले की,  हल्ल्यानंतर त्यांचे डोळे काढण्यात आले. त्या सध्या दिल्लीत वास्तव्यास आहेत. नोव्हेंबर २०२०  पासून पती आणि मुलासह दिल्लीत उपचारासाठी राहत आहेत. महिलेने सांगितले, की त्यांचे वडील तालिबानचे दहशतवादी होते. त्यांनी खतेरावर हल्ल्याचा कट रचला होता. खतेरा अफगाण पोलिस दलात कार्यरत होत्या.गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्या गर्भवती असतानाच तालिबानने त्यांना प्रचंड मारहाण केली होती. ड्यूटीवरून घरी जाताना त्यांना तीन तालिबानी दहशतवाद्यांनी रोखले होते. यानंतर त्यांनी खतेरा यांचा आयडी तपासला आणि नंतर, त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात त्यांना आठ गोळ्या लागल्या होत्या. इतक्यावर तालिबानी थांबले नाहीतर त्यांन त्यांच्यावर चाकूचे वारही केले. यानंतर त्या बेशुद्ध झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यावर चाकूने वार केले आणि त्यांना मरण्यासाठी सोडून दिले.
  एवढेच नाही, तर तालिबान महिलांसोबत अतिशय क्रुरपणे वागते. तालिबानी महिलांच्या शरीराचे तुकडे कुत्र्यांना खाऊ घालतात. मी नशीबवान आहे, की मी यातुन वाचले. अफगाणिस्तानात तालिबानच्या अधिपत्याखालीच रहावे लागते. येथे महिला, मुलं आणि अल्पसंख्यकावर काय काय अत्याचार केले जातात, याची कल्पना करणेही अवघड आहे, असेही खतेरा म्हणाल्या.