ब्राझीलच्या नदी किनारी घडले हजारो कासवांचे दर्शन, जीवशास्त्रज्ञही पाहून झाले थक्क…

प्यूर्स नदीच्या ( Pure River )  किनाऱ्यालगत हजारोंच्या संख्येमध्ये साऊथ अमेरिकन रिवर टर्टल्स (South American River Turtles) प्रजातीच्या कासवांच्या मुलांची फौज दिसत आहे. हे कासव त्सुनामीच्या (Tsunami) लाटांप्रमाणे नदीतून बाहेर येत होते.

ब्राझीलच्या (Brazil) एका नदीत कासवांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसत आहे. प्यूर्स नदीच्या ( Pure River )  किनाऱ्यालगत हजारोंच्या संख्येमध्ये साऊथ अमेरिकन रिवर टर्टल्स (South American River Turtles) प्रजातीच्या कासवांच्या मुलांची फौज दिसत आहे. हे कासव त्सुनामीच्या (Tsunami) लाटांप्रमाणे नदीतून बाहेर येत होते. मिळालेल्या माहितीनुसार, अजमेन नदीची (Ajmen River) उपनदी असलेल्या पर्स नदीच्या काठावरील संरक्षित क्षेत्रात कासवांना गोळा करण्यात आले आहे.

साऊथ अमेरिकन रिवर टर्टल्स

ब्राझीलच्या वाईल्डलाईफ कंजर्वेशन सोसायटीमध्ये हजारों कासवांचे फोटो आणि व्हिडिओ एका ट्विटरच्या माध्यमातून समोर आले आहे. हे कासव अजून लहान आहेत. कासवांची ही प्रजाती दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याच्या कासवांपैकी एक आहे. ब्राझीलच्या या प्रदेशात दक्षिण अमेरिकन नदीचे कासव दरवर्षी प्रजननासाठी येतात. या कासवांना अंड्यातून बाहेर येण्यासाठी महिन्याभराचा कालावधी लागतो. प्रत्येक दिवशी हजारो संख्यांमध्ये कासव आपल्या अंड्यातून बाहेर पडल्यानंतर लाखोच्या गर्दीत समाविष्ट झाल्यासारखे दिसतात. तसेच अशाप्रकारचे चक्र अनेक दिवसांपर्यंत सुरू असते.

हजारो संख्यांमध्ये कासवांचे दर्शन

कासवाची ही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत त्यांचे व्यवस्थापन आणि संवर्धन सुधारण्यासाठी संशोधन नेहमीच केले जाते. वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य संरक्षित क्षेत्रात महिला प्रौढ कासवांचं संरक्षण करतात. कासवांच्या या प्रजाती मांस आणि अंडी वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहेत. साऊथ अमेरिकन रिवर टर्टल्सचा जन्म अशाच प्रकारे होत असतो. परंतु त्यांच्या जीवनातला हा क्षण खूपच नाजूक असतो. आपल्या जीनवातला प्रवास सुरू करताना हे कासव एकत्र दिसतात. परंतु काही कालावधीनंतर ते वेगळे होऊन दूर जातात.