चीनपासून पुन्हा जगाला धोका? चीनच्या अणुभट्टीतून मोठ्याप्रमाणातून किरणोत्सर्ग

हॉंगकॉंग बेटापासून सुमारे ७०० किमी अंतरावर समुद्र किनाऱ्यावर तैशानमध्ये चिनी अणुभट्टी आहे. या अणुभट्टीचे सर्व कामकाज चिनी तंत्रज्ञ हाताळतात. मात्र गंभीर प्रश्न निर्माण झाल्यास सल्ला देण्यासाठी चीनने फ्रान्सच्या एका संस्थेची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.चिनी तंत्रज्ञांकडून झालेल्या चुकांमुळे अणुभट्टीतून मागील एक-दोन महिन्यांपासून किरणोत्सर्ग होत आहे.

    बीजिंग : चीनपासून पुन्हा एकदा जगाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण चीनच्या तैशान अणुभट्टीतून मोठ्या प्रमाणावर किरणोत्सर्ग सुरू झाला.अणुभट्टी हाताळताना गडबड झाल्यामुळे हे किरणोत्सर्ग सुरु झाले. किरणोत्सर्ग होत असूनही चीनने चूक झाल्याची कबुली दिली नाही. अखेर या अणुभट्टीसाठी सल्लागार म्हणून काम करणाऱ्या फ्रान्सच्या संस्थेने आंतरराष्ट्रीय दबाव आणून चीनला तैशान अणुभट्टी बंद करण्यास भाग पाडले.

    चीनच्या वुहानमधून कोरोना संकटाची सुरुवात झाली. पण चीनने ही माहिती दडवली आणि जगावर कोरोना संकट कोसळले.आता देखील चीनने तेच केले आहे. अणुभट्टी बंद करताना चीनने तांत्रिक देखभालीचे कारण दिले आहे. प्रत्यक्षात किरणोत्सर्ग गळतीचे प्रमाण वाढल्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय दबावाला तोंड देणे कठीण झाल्यामुळे चीनने तैशान अणुभट्टी बंद केली आहे

    हॉंगकॉंग बेटापासून सुमारे ७०० किमी अंतरावर समुद्र किनाऱ्यावर तैशानमध्ये चिनी अणुभट्टी आहे. या अणुभट्टीचे सर्व कामकाज चिनी तंत्रज्ञ हाताळतात. मात्र गंभीर प्रश्न निर्माण झाल्यास सल्ला देण्यासाठी चीनने फ्रान्सच्या एका संस्थेची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.चिनी तंत्रज्ञांकडून झालेल्या चुकांमुळे अणुभट्टीतून मागील एक-दोन महिन्यांपासून किरणोत्सर्ग होत आहे. फ्रान्सच्या संस्थेने चीनला अणुभट्टीतील चुका दुरुस्त करण्यासाठी वारंवार सल्ला दिला. पण चीनने फ्रान्सच्या संस्थेच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. अखेर फ्रान्सच्या संस्थेने आंतरराष्ट्रीय दबाव आणून चीनला तैशान अणुभट्टी बंद करण्यास भाग पाडले.