आज तालिबांनी करणार सत्ता स्थापनेची घोषणा

सद्यस्थितीला आफगाणिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. त्यामुळे येत्या काळात अफगाणिस्तानला जगातील इतर देशांकडून दिल्या जाणारी आर्थिक मदत , देणगीदार व भविष्याच्या दृष्टीकोनातून इतर देशांकडून केली जाणारी गुंतवणूक यावर अवलंबून राहावे लागाणार आहे

    काबूल: अफगाणिस्तानवर(Afghanistan) १५ ऑगस्टच्या दिवशी तालिबान्यांनी कब्जा मिळवलेल्या घटनेला आता २ आठवडे उलटले आहे. अफगाणिस्तानतून अमेरिकेचे संपूर्ण सैन्यही परतले आहे. अमेरिकेचे सैन्य परतल्यानंतर तालिबान्यांनी आता सरकार स्थापनेचा निर्णय घेतला आहे. आज (शुक्रवार)च्या प्रार्थनेनंतर(after Friday prayer )तालिबानी सरकार स्थापनेची घोषणा करण्याची शक्य व्यक्त केली जात आहे.

    अनेक वर्षांचे युद्ध , रक्तपात व हजारो नागरिकांचे बळी गेल्यानंतर तालिबान्यांनी अफगाणिस्थानामध्ये शांतात व सुरक्षा प्रस्थापित कारण्याचे आश्वासन दिले आहे. इतकेच नव्हेतर अफगाणिस्तानच्या भूमिकांच्या कोणत्याही चुकीच्या कारवायांसाठी वापर करून देणारा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

    सद्यस्थितीला आफगाणिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट (The financial situation is dire)आहे. त्यामुळे येत्या काळात अफगाणिस्तानला जगातील इतर देशांकडून दिल्या जाणारी आर्थिक मदत , देणगीदार व भविष्याच्या दृष्टीकोनातून इतर देशांकडून केली जाणारी गुंतवणूक यावर अवलंबून राहावे लागाणार आहे.

    अफगाणिस्तानमधील घडामोडींचा देशातील कोणत्याही राजकीय पक्षाने मतदारांचे धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी वापर करू नये आणि केल्यास सरकारने कारवाई करावी, असं आवाहन ‘फ्रेंड्स ऑफ अफगाणिस्तान’ फोरमने केलं आहे. अफगाणिस्तानात शांतता प्रक्रिया सुरू करून लोकशाही मार्गाने राजकीय सरकार लवकरात लवकर स्थापन व्हावे. त्यासाठी कोणत्याही देशाने आपल्याला वेगळे न ठेवता सर्वसमावेशक धोरणाद्वारे सामूहिक प्रयत्न करावेत व आपले योगदान द्यावे. तेथील भूमीवरून कोणत्याही देशाविरोधात अतिरेकी कारवाया केल्या जाऊ नयेत, त्यांना पाठबळ दिले जाऊ नये, असे फोरमने म्हटले आहे.