देहरादून येथील इंडियन मिलिट्री अकॅडमीमध्ये होता तालिबानचा ‘हा’ टॉप कमांडर

आयएमएच्या बॅचमधील त्याच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की, स्टानिकजईचं शरीर खूप मजबूत होतं. त्याची उंची कमी प्रमाणात होती. तसेच तो कट्टर धार्मिक विचारांचा कधीच नव्हता. स्टानिकजईचं वय फक्त 20 वर्षांचं होतं. तेव्हा भगत बटॅलियनच्या केरेन कंपनीमध्ये 45 जेंटलमन कॅडेटसोबत आयएमएमध्ये आला होता.  

    देहरादून – अफगाणिस्तानमध्ये सत्तापालट झाली असून तालिबानकडून संंपूर्ण शहरात कब्जा करण्यात आला आहे. तालिबानच्या 7 खतरनाक नेत्यांमधून एक टॉप कमांडर मोहम्मद अब्बास स्टानिकजई (60) देहरादून येथील इंडियन मिलिट्री अकॅडमीमध्ये होता. आयएमएच्या1982 च्या बॅचमध्ये त्याच्या सहकारी मित्रांनी त्याच नाव शेरू ठेवलं होतं.

    आयएमएच्या बॅचमधील त्याच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की, स्टानिकजईचं शरीर खूप मजबूत होतं. त्याची उंची कमी प्रमाणात होती. तसेच तो कट्टर धार्मिक विचारांचा कधीच नव्हता. स्टानिकजईचं वय फक्त 20 वर्षांचं होतं. तेव्हा भगत बटॅलियनच्या केरेन कंपनीमध्ये 45 जेंटलमन कॅडेटसोबत आयएमएमध्ये आला होता. 

    सर्व लोक त्याला पसंत करीत

    रिटायर मेजर जनरल डीए चतुर्वेदी त्याचे बॅचमेट होते. त्यांनी सांगितलं की, त्याला सर्व लोक पसंत करायचे. तो अकॅडमीच्या दुसऱ्या कॅडेटमधून त्याचं वय जास्त दिसत होतं. त्याची मिशी डौलदार होती. त्यावेळी त्याचे विचार एवढे कट्टर नव्हते. तो एक अफगान कॅडिट प्रमाणेच होता. जो येथे येऊन खूप समाधानी होता. रिटायर मेजर जनरल चतुर्वेदींना परम विशिष्ट सेवा मंडळ, अति विशिष्ट सेवा मंडळ आणि सेना मेडल मिळालं आहे.