हृदयस्पर्शी ! आई जग सोडून गेली ; आता लेकरांसाठी वडीलच बनले आई.. हंसाचा हा Video पाहून तुम्हीही व्हाल भावुक

छायाचित्रकार मॅथ्यू रॅफमन यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये तीन लहान हंस वडिलांच्या पंखांमधे बसलेले आहेत आणि चौथा एक पाण्यात त्यांच्या मागे जात आहे. तसेच त्याने शेअर केलेला व्हिडिओ सध्या ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही जोरदार व्हायरल होत आहे.सोशल मीडियावर व्हिडिओ आणि छायाचित्रांचे लोक जोरदार कौतुक करीत आहेत.

    नवी दिल्ली : काही दृश्य इतकी हृदयस्पर्शी असतात की पाहूनच डोळ्यांच्या कडा पाणावतात. आपण अनेकदा पाहिले आहे की कोणाची आई हे जग सोडून गेली असेल तर आईच्या मृत्यूनंतर वडील आईसारखी मुलांची काळजी घेतात. मात्र प्राण्यापक्ष्यांमध्ये हे चित्र तुम्ही पाहिलं नसेल तर या हंसाला नक्की पाहा. या हंसाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

    काय आहे व्हिडियोमध्ये
    मादी हंसच्या मृत्यूनंतर, एक नर हंस आपल्या मुलांना त्याच्या पाठीवर घेऊन फिरत आहे. जेव्हा फोटोग्राफर मॅथ्यू रॅफमन यांनी हंसची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली तेव्हा ते पाहून लोक भावूक झाले. वडील हंसची ही छायाचित्रे बोस्टनची आहेत.

    मॅथ्यू रॅफमनच्या पोस्टनुसार, मादी हंसने ६ निरोगी बाळांना जन्म दिला, परंतु काही दिवसांपूर्वीच काही कारणास्तव तिचा मृत्यू झाला. यानंतर वडील हंस यांनी मुलांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. मॅथ्यू रॅफमनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘गेल्या आठवड्यात बोस्टनमध्ये ६ बाळ हंसांचा जन्म झाला होता. अज्ञात कारणांमुळे काही दिवसांनी आईचे निधन झाले. एक बाळा हंस बुडाला तर दुसर्‍याला अ‍ॅनिमल कंट्रोलने वाचविले, पण आता बाकीचे बाळ हंस वडिलांसोबत आहेत.

    वडील हंस हाच ‘फादर ऑफ द इयर’

    छायाचित्रकार मॅथ्यू रॅफमन यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये तीन लहान हंस वडिलांच्या पंखांमधे बसलेले आहेत आणि चौथा एक पाण्यात त्यांच्या मागे जात आहे. तसेच त्याने शेअर केलेला व्हिडिओ सध्या ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही जोरदार व्हायरल होत आहे.सोशल मीडियावर व्हिडिओ आणि छायाचित्रांचे लोक जोरदार कौतुक करीत आहेत. विल्यम कोडी नावाच्या युझर्सने लिहिले की, एक महान पिता कसा असावा हे निसर्ग आपल्याला शिकवत आहे. त्याच वेळी अँजेला राईट नावाच्या युझर्सने लिहिले की, माझ्या मते, ‘फादर ऑफ द इयर’ आहे.