महिलेनी केली गणेश मुर्तींची तोडफोड, काय आहे प्रकरण जाणून घ्या

व्हिडिओमध्ये दोन स्त्रिया बहरीनच्या ज्यूफेअरमधील एका सुपरमार्केटमध्ये कर्मचार्‍यांशी वाद घालताना दिसत आहेत. चर्चेदरम्यान, दोन महिला मूर्तींपैकी एक रॅकवरून खाली टाकत आहेत.

बहरीन : बहरीनमधील एका सुपरमार्केटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये असे दिसते आहे की, एक महिला  गणेश मुर्ती उचलून टाकत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बहरीन पोलिसांनी कारवाई केली आहे आणि ट्विटरवर निवेदन देताना पोलिसांनी सांगितले की या महिलेवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. 

व्हायरल व्हिडिओमध्ये दोन स्त्रिया बहरीनच्या ज्यूफेअरमधील एका सुपरमार्केटमध्ये कर्मचार्‍यांशी वाद घालताना दिसत आहेत. चर्चेदरम्यान, दोन महिला मूर्तींपैकी एक रॅकवरून खाली टाकत आहेत.  

हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर बहरीन सरकारने याचा तपास केली आणि, ५४ वर्षांच्या महिलेवर मालमत्तेचे नुकसान आणि धार्मिक भावना दुखावल्याने आणि बदनामी केल्याबद्दल कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

बहरीनच्या गृहमंत्रालयाने ट्विट केले की, पोलिसांनी ५४ वर्षीय महिलेविरूद्ध कायदेशीर कारवाई केली आहे.