या देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे बर्‍याचदा कुठल्यान कुठल्या कारणाने चर्चेत असतात, मग ते आपल्या वक्तव्यासाठी असोत किंवा इतर काही कारणास्तव असतील. पुन्हा एकदा असेच काहीसे घडले की ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसन सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

    ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे बर्‍याचदा कुठल्यान कुठल्या कारणाने चर्चेत असतात, मग ते आपल्या वक्तव्यासाठी असोत किंवा इतर काही कारणास्तव असतील. पुन्हा एकदा असेच काहीसे घडले की ब्रिटिश Britain पंतप्रधान बोरिस जॉनसन PM Boris Johnson सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

    झालय काय तर, यूके पोलिस स्मारकाच्या अनावरणा दरम्यान पाऊस पडत होता. ब्रिटनचे राजकुमार चार्ल्स, पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि गृहमंत्री प्रिती पटेल पोलिस दलाच्या निर्मितीदरम्यान ज्यांनी आपला जीव गमावला त्या सर्वांची आठवण म्हणून श्रध्दांजली देत होते. या दरम्यान, बोरिस जॉन्सन यांना त्यांची छत्री हाताळता येत नव्हती. मुसळधार पाऊस आणि वारा यामुळे छत्री उलटली. या घटनेमुळे प्रिन्स चार्ल्स आणि जॉन्सनच्या शेजारी बसलेल्या इतर अधिकाऱ्यांना हसू आवरलं नाही इतकच काय स्वत: जॉन्सन देखील छत्री हाताळता येत नसल्याने हसताना दिसतात.

    शेवटी म्हणतात न ‘तुम्ही जगातील सर्वात शक्तिशाली लोकांपैकी एक असलात तरी जर तुमचा दिवसच खराब असेल तर तुम्ही काहीच करु शकत नाही. आणि जर तुम्ही पब्लिक फिगर असाल तर संपुर्ण जग तुमची मजा बघायला आलेलं असतं. असो…

    दरम्यान, हा व्हिडीओ एका वृत्त संस्थेने शेअर असून तो सध्या तुफान व्हारल झाला आहे.

    Trending video on social media Britain pm Boris Johnson struggles to hold umbrella amuses Prince Charles