अमेरिका-भारत संबंधांना ट्रम्प-बायडेन दोघांचेही समर्थन, अमेरिकेतील कोणत्याही प्रशासकासाठी भारताशी मैत्री गरजेची

वॉशिंग्टन : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना, भारताशी असेले संबंध हा चर्चेचा विषय ठरतो आहे. मात्र अमेरिका-भारत (US-India relations) संबंधांना दोन्ही पक्षांचे समर्थन असून, कोणीही सत्तेवर आले तरी भारताशी संबंध महत्त्वपूर्णच असतील, अशी माहिती अमेरिकेच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने दिली आहे. भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश स्वतंत्र, सुरक्षित, समृद्ध असून, जागितक शांततेसाठी ६ काम करत असल्याची अमेरिकेतील दोन्ही पक्षांची धारणा आहे. अमेरिका केवळ एकट्याच्या बळावर जागतिक आव्हानांना सोमोरे जाऊ शकत नाही, अशा परिस्थितीत भारतासाऱ्या देशाशी मैत्रीपूर्ण संबंध गरजेचे असल्याचे मत अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॉर्गन ओर्टागस यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितले की ,’लोकशाही परिपूर्ण नाही मात्र यात जबाबदारी आणि पारदर्शकता स्पष्ट असते.

येत्या ५ ते १० वर्षांत जी आजगित आव्हाने येणार आहेत, त्यांचा सामना अमेरिका एकटी करु शकत नाही. आम्हाला आमच्या साथीदारांना सोबत घून काम करावे लागेल. जगभरातील अगणित आव्हानांचा विचार केल्यास, या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी भारतासोबतचा सहयोग हा महत्त्वाचा राहणार आहे. अमेरिका आणि भारत एकत्रितरित्या या आव्हानांचा सामना करीत आहेत.’ मॉर्गन ओर्टागस यांनी सांगितले की भारत आणि अमेरिकेतील संबंध दृढ आणि मजबूत आहेत, तसेच भविष्यातही ते तसेच राहतील. भारत-अमेरिकेतील हे संबंध अमेरिकेतील राजकीय पक्षांच्या राजकारणाशी निगडीत नाहीत, तर राष्ट्राच्या भूमिकेशी संबंधित आहेत.

डोनाल्ड ट्रम्प किंवा जो बायडेन या दोघांसांठीही ते तितकेच महत्त्वाचे राहणार आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टीतर्फे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पार्टीतर्फे जो बायडेन यांच्यात लढत आहे. जगभरात अनेक क्षेत्रांमध्ये भारतीयांचा वाढता सहभाग आणि नेतृत्व, हे अमेरिकन सरकारला उत्साहवर्धक वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. चीनकडून होत असलेल्या सैन्यांच्या हालचालीं, हा सध्या जगभरातील महाशक्ती असलेल्या देशांमध्ये प्रमुख चर्चेचा विषय आहे.

भारत आणि अमेरिकेतील तिसऱ्या टू प्लस टू या चर्चे दरम्यानही भारत-चीन सीमावाद, हिंद प्रशांत क्षेत्रातील परिस्थितीबाबात प्रामुख्याने चर्चा झाली. हाऊडी मोदी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाचा उल्लेखही ओटार्गस यांनी केला. नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील मैत्रीचा उल्लेख करत, संरक्षण, सुरक्षा याबाबतच्या सहयोगावर लक्ष केंद्रीत करण्याबरोबरच कोरोनासारख्या आव्हानांना गोन्ही देश एकत्रित सामोरे जात असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही देशांतील आर्थिक संबंध अधिक दृध होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.