अमेरिकेला अडचणीत आणण्यासाठी ट्रम्प करू शकतात अण्वस्त्रांचा हल्ला!

ट्रम्प हे अमेरिकेला अडचणीत आणण्यासाठी अण्वस्त्रांचा हल्ला कोणत्याही देशावर करू शकतात अशी भीती असतानाचा डेमोक्रेट सदस्यांनी ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव सादर केला आहे.

  •  डोनाल्ड ट्रम्पच्या अडचणींत वाढ महाभियोग प्रस्तावावर मतदान

वॉशिंग्टन. अमेरिकेच्या संसदेत गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारामुळे महासत्ता हडबडली आहे. मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेला अडचणीत आणण्यासाठी अण्वस्त्रांचा हल्ला कोणत्याही देशावर करू शकतात अशी भीती असतानाचा डेमोक्रेट सदस्यांनी ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावावर उद्या मतदान होण्याची शक्यता आहे. या मुळे ट्रम्प यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

पहिले राष्ट्राध्यक्ष
प्रस्ताव सादर झाल्यानंतर संसदेत बहुमत असलेले नेते स्टेनी होयर यांनी सांगितले की, जर हा प्रस्ताव संमत झाल तर डोनाल्ड ट्रम्प हे पहिले रिपब्लिकन राष्ट्राध्यक्ष असतील ज्यांना दोनदा महाभियोगाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे या प्रस्तावाला विरोध करताना रिपब्लिकन सदस्य एलेक्स मुने यांनी सांगितले की, सदनाने हा प्रस्ताव फेटाळावा. प्रतिनिधी सभेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी आरोपांचा मसुदा संसदेत ठेवण्याआधी सांगितले की, आमचे संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी आम्हाला तत्काळ पाऊले उचलायला हवीत. कारण राष्ट्राध्यक्ष पदी ट्रम्प यांचे राहणे संविधानाला धोक्याचे आहे.

लागणार २४ तासांचा वेळ
पेलोसी यांच्या टीमने बनविलेले २५ वे संशोधन लागू करण्यासाठी उपराष्ट्रपती माईक पेन्स आणि कॅबिनेटच्या मंत्र्यांना रात्री उशिरा या मसुद्यावर मतदान करण्यास सांगण्यात येणार आहे. संसदेचे अधिवेशन सुरू नसल्याने या मतदानावर संकट येऊ शकते. यामुळे हे पाऊल उचलले जाणार असून त्यानंतरच मंगळवारी पूर्ण सदनासमोर हा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. हा मसुदा मांडल्यानंतर पेंस आणि कॅबिनेटकडे महाभियोग प्रस्तावावर कार्यवाही करण्यासाठी २४ तासांची वेळ असणार आहे.