फेसबुक-गुगलविरोधात ट्रम्प कोर्टात

या कंपन्यांनी माझ्या हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत डोनाल्ड ट्रम्प यांनी खटला दाखल केला आहेत. अमेरिकेच्या राज्यघटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. मात्र, या कंपन्यांनी त्याचे उल्लंघन केले असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी गुगल, फेसबुक आणि ट्विटर या कंपन्याच्या प्रमुखांवरही खटला दाखल केला आहे.

    वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेसबुक, ट्विटर आणि गुगलविरोधात याचिका दाखल केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी या कंपन्यांवर चुकीच्या पद्धतीने सेन्सॉर केल्याचा आरोप केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे सोशल मीडियावरील अकाउंट या कंपन्यांनी बंद केले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी मियामीच्या जिल्हा कोर्टात याचिका दाखल केली आहे.

    या कंपन्यांनी माझ्या हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत डोनाल्ड ट्रम्प यांनी खटला दाखल केला आहेत. अमेरिकेच्या राज्यघटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. मात्र, या कंपन्यांनी त्याचे उल्लंघन केले असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी गुगल, फेसबुक आणि ट्विटर या कंपन्याच्या प्रमुखांवरही खटला दाखल केला आहे.

    यामध्ये फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग, ट्विटरचे जॅक डोर्सी आणि गुगलचे सुंदर पिचई यांचा समावेश आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लढाई आम्ही कोर्टात लढणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या मुद्यावर मिळवलेला हा सर्वात मोठा विजय असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.