सोपे अवघड झाले हो, ट्रम्प सरकारने एच -१बी व्हिसाचे नियम बदलले हो

अमेरिकेच्या गृह मंत्रालयाने मंगळवारी घोषित केलेल्या अंतरिम नियमांमुळे विशेष व्यवसाय या संज्ञेची व्याप्ती कमी होऊ शकते. कंपन्या विशेष व्यवसाय असे नमूद करुन बाहेरील कर्मचाऱ्यांच्या एच-१ बी व्हिसासाठी अर्ज करतात. ट्रम्प सरकारने  राष्ट्राध्यक्ष निवडणुकीला ४ आठवड्यांपेक्षा कमी कालावधी उरलेला असताना एच-१ बी व्हिसाबाबत निर्णय घेतला आहे.

अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प सरकारने स्थानिक कामगारांच्या सुरक्षेसाठी निवडणुकीआधी एच-१बी व्हिसासंदर्भातील नियम (new rulesfor h-1b visa)बदलले आहेत. या निर्णयामुळे भारतातील आयटीमधील हजारो लोकांवर प्रभाव (effect on indian it)पडू शकतो.

अमेरिकेच्या गृह मंत्रालयाने मंगळवारी घोषित केलेल्या अंतरिम नियमांमुळे विशेष व्यवसाय या संज्ञेची व्याप्ती कमी होऊ शकते. कंपन्या विशेष व्यवसाय असे नमूद करुन बाहेरील कर्मचाऱ्यांच्या एच-१ बी व्हिसासाठी अर्ज करतात. ट्रम्प सरकारने  राष्ट्राध्यक्ष निवडणुकीला ४ आठवड्यांपेक्षा कमी कालावधी उरलेला असताना एच-१ बी व्हिसाबाबत निर्णय घेतला आहे. या एच-१ बी व्हिसामुळे अमेरिकेतील कंपन्यांना परदेशातील कर्मचाऱ्यांना विशेष व्यवसायांमध्ये नियुक्त करण्याची परवानगी मिळते. यासाठी तांत्रिक किंवा सैद्धांतिक निपुणतेची आवश्यकता असते.

अमेरिकेतील अनेक कंपन्या एच-१ बी व्हिसाद्वारे भारत आणि चीनसारख्या देशांमधून दरवर्षी हजारो कर्मचारी नियुक्त करत असतात. मात्र या व्हिसासाठीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आल्याने आधीच अनेक भारतीयांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. अनेकजण अमेरिकेतून भारतात परतले आहेत. आता नवे नियम ६० दिवसांनी लागू केल्यावर आणखी काही लोकांच्या नोकरीवर परिणाम होऊ शकतो.