Trying to catch a running plane! Taliban terrorized; Three people fell while the plane was in the air in Afghanistan

सोशल मीडियात संबंधित घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून या व्हिडिओची सत्यता पडताळून पाहण्यात आलेली नाही. विमान इतक्या उंचावर होते की खाली पडलेले तिघेही एका इमारतीवर पडले. या तिघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.

    काबूल : तालिबानी अतिरेक्यांनी अफगाणिस्तानात सत्तांतर घडवून आणत देशाची सत्ता काबीज केली आहे. काबुल विमानतळावरुन अफगाण नागरिकांना घेऊन जाणाऱ्या विमानाचे टेकऑफ झाल्यानंतर तीन नागरिक विमानात गर्दी असल्यानं जागा मिळाली नाही आणि विमानातून खाली पडले(Trying to catch a running plane).

    सोशल मीडियात संबंधित घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून या व्हिडिओची सत्यता पडताळून पाहण्यात आलेली नाही. विमान इतक्या उंचावर होते की खाली पडलेले तिघेही एका इमारतीवर पडले. या तिघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.

    देशातील नागरिक देश सोडून पळत असल्याचे चित्र आहे. यामुळे काबुल विमानतळावर मोठी गर्दी झाली होती. वाढत्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली आहे. गर्दीला पांगवण्यासाठी अमेरिकन सैनिकांनी हवेत गोळीबार करावा लागला. तणावपूर्ण स्थितीत पाच जणांचा मृत्यू झाला.