
तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष(turkey president) तय्यिप एर्डोगन(erdogan) यांच्या प्रसार माध्यमांसंदर्भातील विभागाने राष्ट्राध्यक्ष व्हॉट्स अॅपचा प्लॅटफॉर्म सोडत असल्याची घोषणा केली आहे.
तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष(turkey president) तय्यिप एर्डोगन(erdogan) यांच्या प्रसार माध्यमांसंदर्भातील विभागाने राष्ट्राध्यक्ष व्हॉट्स अॅपचा प्लॅटफॉर्म सोडत असल्याची घोषणा केली आहे. तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयानेही यापुढे आपण व्हॉट्सअॅपचा वापर करणार नसल्याचं सांगितलं आहे. नुकतेच व्हॉट्सअॅपने आपली प्रायव्हसी पॉलिसी म्हणजेच खासगी माहितीसंदर्भात धोरणामध्ये बदल केला. त्यानंतर तुर्कीने घेतलेली ही भूमिका महत्वाची आहे.
राष्ट्राध्यक्ष एर्डोगन यांनी ११ जानेवारी रोजी आपले व्हॉट्सअॅप ग्रुप इनस्क्रिप्टेड मेसेजिंग अॅप असणाऱ्या बीपवर ट्रान्सफर करण्याचे आदेश दिले. बीप हे तुर्कीमधील एक इनस्क्रिप्टेड अॅप आहे. या अॅपची मालकी तुर्कीमधील तुर्कसेल इलेटिसिम हिजमेटलेरी एएस या कंपनीकडेच आहे. तुर्कीमध्ये आता या बीप अॅपवरुनच राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयातून तसेच संरक्षण मंत्रालयासंदर्भातील सूचना केल्या जातील. राष्ट्राध्यक्षांनी व्हॉट्सअॅप सोडल्याची घोषणा केल्यानंतर देशामध्ये अमेरिकन कंपनीच्या मालकीच्या या इन्स्टंट मेसेजिंग अॅपसंदर्भात आवाज उठू लागला आहे. देशातील लाखो व्ह़ॉट्सअॅप युझर्सने व्हॉट्सअॅप बंद करुन बीपकडे आपला मोर्चा वळवला आहे.
तुर्कसेल कंपनीने रविवारी दिलेल्या माहितीनुसार २४ तासांमध्ये १० लाखांहून अधिक नवीन युझर्सने हे मेसेंजर अॅप डाऊनलोड केलं आहे.