दोन डोगरांमधील रोप वे दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू, दोन लहानगे जखमी, इटलीतील स्ट्रैसा शहरातील घटना

इटलीतील हा परिसर आल्प्स पर्वत रागांत येतो. इथे जगभरातून पर्यटक येतात. याच ठिकाणी मेगियोर तलाव आहे, दोन पर्वतांतून प्रवास करण्यासाठी केबल कार म्हणजेच रोप वेची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. या रोप वेच्या प्रवासाचे अंतर ४९०० फूट आहे, हे अंतर कापण्यासाठी २० मिनिटांचा कालावधी लागतो.

    स्ट्रैसा : इटलीत पर्यटन जीवावत बेतलं आहे. रिववारी झालेल्या एका रोप वेच्या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला आहे, या दुर्घटनेत ९ जण गंभीर जखमी झाले असून यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. वीकेन्ड पर्यटन आणि रिझॉर्टसाठी प्रसिद्ध असलेल्या स्ट्रैसा शहरात ही घटना घडली आहे. हा परिसर मेगियार तलावाच्या जवळ आहे आणि पिडामॅन्ट जिल्ह्यायत येतो. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून, प्रथम दर्शनी तांत्रिक कारणामुळे ही दुर्घटना झाल्याचा अंदाज आहे.

    इटलीतील हा परिसर आल्प्स पर्वत रागांत येतो. इथे जगभरातून पर्यटक येतात. याच ठिकाणी मेगियोर तलाव आहे, दोन पर्वतांतून प्रवास करण्यासाठी केबल कार म्हणजेच रोप वेची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. या रोप वेच्या प्रवासाचे अंतर ४९०० फूट आहे, हे अंतर कापण्यासाठी २० मिनिटांचा कालावधी लागतो.

    ही दुर्घटना झाली, त्याचे नेमके कारण समोर आलेले नसल्याचे आपत्कालीन यंत्रमेकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रॉली कार ही केवळ १०० मीटर अंतरावर होती. ही ट्रॉली कोसळल्यानंतर, ९ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर तीन जणांचा मृत्यू रुग्णालयात झाल्याची माहिती आहे. अजून ९ जखमींवर रुग्णालयांवर उपचार सरु असून, त्यात दोन मुलांचा समावेश आहे, त्या मुलांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते आहे.

    या प्रकरणात प्रशासनही अडचणीत आले आहे. यापूर्वी २०१४ साली मेन्टेनन्ससाठी ही सुविधा बंद करण्यात आली होती, त्याही वेळी या रोप वेच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर दोन वर्षांनी २०१६ साली ही सुविधा पुन्हा सुरु करण्यात आली, त्यानंतर या रोप वे चा मेन्टेनन्स करण्यात आला नव्हता.

    Twelve killed two injured in ropeway accident between two hills