एका ट्विटची किंमत इतकी की, आकडा मोजतानाही बोबडी वळेल; जाणून घ्या नेमकं प्रकरण

डोरसीनं शनिवारी आपलं ६ मार्च २००६ चं पहिलं ट्विट क्रिप्टोकरंसीच्या रुपात विकण्याची (Twitter CEO Puts up First Tweet For Sale) घोषणा केली आहे. डोरसी यांच्या या ट्विटसाठी आतापर्यंत २,६७,००० डॉलरची बोली लागली आहे.

    ट्विटरचे सीईओ जॅक डोरसी यांचे ट्विट (Twitter) आता विक्रीसाठी तयार आहे. जॅक डोरसी (Jack Dorsey) यांनी स्वतः याबद्दलची घोषणा केली आहे. डोरसीनं शनिवारी आपलं ६ मार्च २००६ चं पहिलं ट्विट क्रिप्टोकरंसीच्या रुपात विकण्याची (Twitter CEO Puts up First Tweet For Sale) घोषणा केली आहे.

    डोरसी यांच्या या ट्वीटसाठी आतापर्यंत २,६७,००० डॉलरची बोली लागली आहे. डोरसी यांचं १५ वर्षांपूर्वीच हे ट्विट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील आतापर्यंतच्या सर्वात प्रसिद्ध ट्विटपैकी एक आहे. या डिजीटल मेमरीसाठी कितीही किंमत मोजण्यासाठी बोली लावणारे आकर्षित होऊ शकतात. या ट्विटची आतापर्यंतची सर्वाधिक बोली 100,000 डॉलर म्हणजेच जवळपास 73.1 लाख इतकी लागली आहे.

    काय होतं डोरसी यांचं पहिलं ट्विट :

    जॅक डोरसी यांचं पहिलं ट्विट ६ मार्च २००६ चं आहे. यात डोरसी यांनी लिहिलं, की जस्ट सेटिंग अप माय ट्विटर (“just setting up my twttr”). डोरसीनं शनिवारी एक लिंक ट्विट केली यामध्ये ट्वीट खरेदीसाठीची बोली प्रक्रिया सुरू होती. वॅल्यूएबल्सच्यानुसार, आपण जे खरेदी करत आहात ते ट्विटचं एक डिजीटल सर्टिफिकेट आहे. हे वेगळं आहे, कारण याला निर्मात्याद्वारे हस्ताक्षरित आणि प्रमाणित केलं गेलं आहे.

    कुठे विकले जाणार ट्विट :

    डोरसीचं पहिलं ट्विट NFT वर विकलं जाईल. NFT म्हणजे नॉन-फंजिबल टोकन. NFT एथेरियम ब्लॉकचेनवर एक डिजिटल टोकन आहे. हे युनिक डिजिटल वस्तूंना खरेदीची आणि विक्रीची परवानगी देतं आणि ब्लॉकचेनचा वापर करणाऱ्या लोकांचा रेकॉर्ड ठेवतं. एका ट्विटच्या खरेदीदाराला एक ऑटोग्राफ्ड डिजिटल सर्टिफिकेट मिळेल. याला क्रिप्टोग्राफीचा वापर करत हस्ताक्षरित केलं गेलं असेल. यात व्हॅल्युएबल वेबसाईटनुसार मूळ ट्विटचा मेटाडेटा सामील असेल. ट्विट ट्विटरच्या वेबसाईटवरही उपलब्ध असेल.