donald trump

वॉशिंग्टन : सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरने अमेरिकेचे मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या खात्यावर तात्पुरती स्थगिती लादली आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसल्याचे बोलले जात आहे. अमेरिकेच्या न्यूज वेबसाईटने आपल्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे.

ट्रम्प यांनी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तसेच आणि टेक्सास खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर एकापाठोपाठ एक ट्विट करीत वादग्रस्त विधाने केली होती. यामुळे ट्विटरने रेड मार्किंग करीत ते खाते तात्पुरते स्थगिती केले आहे.

याचबरोबर, ट्विटरने ट्रम्प यांचे निवडणुकीशी संबंधित ट्विट रिट्वीट करणाऱ्या यूजर्सचेही खाते स्थगिती केले आहे. रिपोर्टनुसार, ट्रम्प यांचे ट्विट वाचण्याचा किंवा शेअर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वापरकर्त्याला, ट्विटर नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आणि असे ट्विट इतरांपर्यंत पोहचण्यापासून रोखण्यासाठी ही प्रक्रिया सुरू असल्याची सूचना केली जात आहे.