helicopter colided

मंगळवारी मध्यरात्री प्रांतीय राजधानी लष्करगच्या नैऋत्येकडील नवा-ए-बराकझाई जिल्ह्यात हा अपघात झाला. या दुर्घटनेची माहिती प्रशासनाला मिळताच प्रशासनाचे अधिकारी आणि आपात्कालीन व्यवस्थापनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दुर्घटनेतील जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

काबुल : अफगाणिस्तानच्या (Afghan ) दक्षिणेकडील हेलमंद प्रांतात (southern Helmand) अफगाण सैन्याच्या दोन हेलिकॉप्टर्सची हवेत धडक (air force helicopters collided) झाल्याने मोठा अपघात झाला आहे. दुर्घटनेत कमीतकमी १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळात आहे.

वृत्तानुसार, मंगळवारी मध्यरात्री प्रांतीय राजधानी लष्करगच्या नैऋत्येकडील नवा-ए-बराकझाई जिल्ह्यात हा अपघात झाला. या दुर्घटनेची माहिती प्रशासनाला मिळताच प्रशासनाचे अधिकारी आणि आपात्कालीन व्यवस्थापनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दुर्घटनेतील जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. हा अपघात हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे घडला का? याचा शोध सुरु आहे.

दोन शेजारील प्रांतातील शेकडो तालिबानी स्थानिक अतिरेक्यांमध्ये सामील झाले आणि त्यांनी लष्करगाह ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यावर अलिकडच्या काळात हा प्रांत जोरदार चकमकीचे ठिकाण बनल्याचे सिन्हुआ या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.

दरम्यान मागील महिन्यात २४ सप्टेंबरला उत्तर बगलान प्रांतात तांत्रिक बिघाडामुळे अफगाण हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले होते. या दुर्घटनेतही अफगाणिस्तानचे दोन पायलटचा मृत्यू झाला होता.